शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जे.के.पार्क खाली करण्याच्या मक्तेदाराला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:45 IST

जळगाव - शहरातील मेहरूण तलावलगत असलेली व जे.के..डेव्हलपर्सला भाडेतत्वावर दिलेली मनपाची १८१ चौ.मी. जागा खाली करण्याचे आदेश मनपा ...

जळगाव - शहरातील मेहरूण तलावलगत असलेली व जे.के..डेव्हलपर्सला भाडेतत्वावर दिलेली मनपाची १८१ चौ.मी. जागा खाली करण्याचे आदेश मनपा प्रशासनाने जे.के.डेव्हलपर्सला दिले आहेत. ‘लोकमत’ ने गेल्या तीन दिवसांपासून हा विषय लावून धरला होता. या वृत्ताची दखल घेत मनपा प्रशासनाने बुधवारी जे.के.डेव्हलपर्सला ८१ ब ची नोटीस बजावून, सात दिवसांच्या आत ही जागा खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शिवाजी उद्यानालगत असलेल्या जे.के.पार्कची जागा १९८९ मध्ये जे.के.डेव्हलपर्सला ३० वर्षे करारांतर्गत देण्यात आली होती. याची मुदत २५ डिसेंबर २०१९ मध्ये संपली होती. याबाबत संबंधित भाडेकरूला जानेवारी २०२० मध्ये ८१ ब ची नोटीस बजावण्यात आली होती. वर्षभर मनपा प्रशासनाने या जागेकडे दुर्लक्ष केले होते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनीदेखील मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. अखेर मनपाने ही जागा ताब्यात घेण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, मनपा प्रशासनाने अनेक प्रकरणांमध्ये ८१ ब ची नोटीस बजावल्या आहेत; मात्र नोटीस बजावल्यानंतर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे याप्रकरणी काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

मनपाचे ‘थीम पार्क’ चे नियोजन

२०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शिवाजी उद्यानात बीओटी तत्वावर थीम पार्क साकारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यादृष्टीनेच आता सुरुवात झाल्याचे नगरसेविका ॲड.शुचिता हाडा यांनी सांगितले. या थीम पार्कमध्ये जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांच्या माहितीसह बॉटनिकल गार्डन व बटरफ्लाय पार्क विकसित करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. हाडा यांनी दिली. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे उद्यानांची अवस्था वाईट झाली आहे. त्यामुळे अशा उद्यानांचा विकास करण्यासाठी बीओटी पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. शिवाजी उद्यान व मेहरुण परिसरात विविध फुलांच्या रोपांची लागवड करून बटरफ्लाय गार्डन तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी असलेल्या नैसर्गिक संपत्ती टिकविण्यासाठी जैवविविधतेचे जतन केले जाणार आहे. बीओटी तत्वावर कराराने हे काम देण्यात येणार आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याचे अ‍ॅड. हाडा यांनी सांगितले.