मुक्ताईनगर : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. आता काही दुकानदारही विशेष खबरदारी घेऊ लागले असून ग्राहकां कडून मिळणाऱ्या चलनी नोटांचे निजंर्तुकीकरण करून नोटाही स्वीकारल्या जात आहे. यासाठी गॅसवर पाणी वाफवून, रूम हिटरचा आणि निर्जतुकीकरण स्प्रे चा वापर केला जात आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर महत्वाचे आहे. यासाठी अत्यावश्यक सेवा देणारे दुकानदार दुकाना बाहेर चौकोन आखून सोशल ग्राहकांमध्ये अंतर तर ठेवतच आहेत. परंतु ग्राहकांच्या स्पशार्तून आलेल्या चलनी नोटांना देखील विविध उपायांद्वारे निर्जतुकीकरण करूनच स्वीकारत आहे. यासाठी शहरातील एका मेडिकल दुकानाच्या बाहेर गॅसचा वापर करून स्टील च्या भांड्यात पाणी गरम केले जात आहे आणि भाड्यावरील झाकणावर नोटा ठेऊन निजंर्तुक केले जात आहे. याच प्रमाणे शहरातल्या दोन किराणा दुकानांवर नोटा ग्राहकांच्या हातून स्वीकारण्या आधी काउंटर वर ठेवत त्यावर निर्जंतुकीकरण स्प्रे फवारून घेतल्या जात आहे. तर एका ठिकाणी रूम हिटरच्या गरम हवेने नोटांचे निर्जतुकीकरण केले आहे. कोरोनाच्या धसक्याने सुरक्षितता आणि संक्रमण रोखण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढविली जात आहे.
निजंर्तुकीकरण करून स्वीकारल्या जात आहे नोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 15:21 IST