शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पदक मिळविण्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठी धावा - क्रांती साळवी

By admin | Updated: July 10, 2017 00:49 IST

नियमित धावण्याच्या सरावामुळे उत्साह वाढत असतो. त्यामुळे आपल्या सुदृढ आरोग्यासाठी नियमित धावा असे आवाहन आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवी यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : स्पर्धेत सहभागी होवून व त्या स्पर्धेत विजय प्राप्त करून केवळ पदक मिळविण्यासाठी धावू नका. कारण धावणे म्हणजे केवळ एक नियमितचा सराव नसून ती एक जीवनप्रणाली आहे. नियमित धावण्याच्या सरावामुळे उत्साह वाढत असतो. त्यामुळे आपल्या सुदृढ आरोग्यासाठी नियमित धावा असे आवाहन आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवी यांनी केले. जळगावरनर्स गृप व रोटरी क्लब आॅफ वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सायंकाळी मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे क्रांती साळवी यांच्या ‘दौडो जिंदगी के लीए’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. धावण्यामुळे मिळाला सन्मानक्रांती साळवी म्हणाल्या की, धावण्याचा नियमित सराव करत असताना वेळेचे फार महत्व असते. तसेच स्वत:ची काळजी घेणे देखील फार महत्वाचे असते. घरगुती कामाकडे लक्ष देवून व धावण्याची जीवनप्रणाली स्विकारल्यामुळे अनेक स्पर्धांमध्ये सहभागी झाले. यामुळे आज जो काही सन्मान मिळाला तो केवळ धावण्यामुळे मिळाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अनुभव कथन करताना झाल्या भावूक विविध स्पर्धांमध्ये घेतलेल्या सहभागाचे काही छायाचित्र उपस्थिताना दाखविले. तसेच अशा क्षेत्रात जेव्हा एखादी महिला सहभागी होत असते. तेव्हा महिलांना  कुटुंबियांचे समर्थन फार महत्वाचे असते. ते समर्थन मला मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. अनुभव कथन करीत असताना त्या भावूक झाल्या होत्या. एक-दोन स्पर्धेत विजय मिळविल्यानंतर अपेक्षा वाढत गेल्या त्यामुळे ‘बोस्टन’ मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला असेही त्या म्हणाल्या. तसेच जळगावात रनर्स गृपकडून देखील चांगले काम सुरु  असल्याचे सांगत त्यांनी  कौतुक  केले. तसेच भविष्यात जळगावमध्ये देखील मोठ्या मॅरेथॉनच्या स्पर्धा होतील अशी अपेक्षा व्यक्त केली.