शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपासोबत जाण्याची परवानगी देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 01:13 IST

भाई जगताप यांची माहिती : जिल्हा परिषदेतील पाठिंब्याचा निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाºयांना

जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर सत्तेची चाबी काँग्रेसकडे आहे. जिल्हा परिषदेमध्ये कुणाला पाठिंबा द्यावा याचे अधिकार जिल्हाध्यक्षांसह स्थानिक नेत्यांना दिले आहेत. मात्र भाजपासोबत जाण्याची परवानगी प्रदेशपातळीवर मिळणार नसल्याचे काँग्रेसचे पालक आमदार भाई जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.शासकीय विश्रामगृहावर रविवारी दुपारी ३ वाजता त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी  जिल्हा प्रभारी विनायकराव देशमुख, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील, जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी उपस्थित होते.तडजोडींची चौकशी करण्यात येईलजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. निवडणुकीनंतर प्रदेशस्तरावर चिंतन करण्यात आले आहे. जर कुठे तडजोडी झाल्या असतील तर त्याची चौकशी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.यापुढे आता आघाडीकरून लढणारमुंबई येथे झालेल्या बैठकीत आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणुक न लढविता आघाडी करून लढण्याबाबत निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.जलसंपदा मंत्र्यांकडून यंत्रणेचा गैरवापर; न्यायालयात जाणारमहापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करीत उमेदवारांना पैशांचा पुरवठा केला आहे. मुंबईमध्ये सहा ठिकाणी पैसे पकडले गेले मात्र एकाही आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला नाही. अनेक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक यंत्राच्या तक्रारी आहेत. याबाबत आम्ही न्यायालयात जाणार असल्याचे काँग्रेसचे पालक आमदार भाई जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.पराभव ही एकट्या जिल्हाध्यक्षांची जबाबदारी नाहीनिवडणुकीतील पराभव ही एकट्या जिल्हाध्यक्षांची जबाबदारी नाही तर ती माझ्यासकट सर्व पदाधिकाºयांची आहे. त्यामुळे कुण्या एका व्यक्तीला जबाबदार धरून संघटनेत बदल करण्यात येणार नाही. मात्र संघटनेत ज्या नियुक्त्या झालेल्या नाहीत त्या लवकर केल्या जातील असे ही भाई जगताप यांनी स्पष्ट केले.