शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर महाराष्ट विद्यापीठच्या पदवीधर निवडणुकीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 21:51 IST

उत्तर महाराष्ट विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर मतदार संघातील २०१५ मध्ये नोंदणी करण्यात आलेल्या मतदारांची नावे कायम ठेवण्याचा निर्णय औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 

ठळक मुद्दे२०१५ ची मतदार यादी कायम राहणार उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णयराज्यपालकांकडे याचिका दाखल करणार -अ‍ॅड.जमील देशपांडे 

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.३-उत्तर महाराष्ट विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर मतदार संघातील २०१५ मध्ये नोंदणी करण्यात आलेल्या मतदारांची नावे कायम ठेवण्याचा निर्णय औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 

उत्तर महाराष्ट विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत विद्यापीठाकडून जुलै महिन्यात मतदार नोंदणी सुरु करण्यात आली होती. तसेच २०१५ मध्ये विद्यापीठाने पदवीधर गटातील नोंदणीतील नावे कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता, नवीन मतदारांसाठी ही  नोंदणी विद्यापीठाने सुरु केली होती. मात्र अ‍ॅड.जमील देशपांडे यांनी  २०१५ मध्ये केलेली मतदार नोंदणी रद्द करून, नव्याने मतदार नोंदणीसाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर मंगळवारी औरंगाबाद येथील खंडपीठात कामकाज झाले. 

विद्यापीठ निवडणूक घेवू शकतेयाचिकाकर्ते अ‍ॅड. देशपांडे यांच्याकडून नवीन विद्यापीठ कायद्यानुसार पुणे व मुंबई विद्यापीठाने नव्याने पदवीधर मतदार संघातील मतदारांची नाव नोंदणी केली असल्याचे न्यायालयात सांगितले. तर विद्यापीठाकडून अ‍ॅड.श्यामकांत भादलीकर यांनी नवीन विद्यापीठ कायदा १४७ क नुसार पदवीधर मतदार नोंदणी पुन्हा नव्याने घेण्याची गरज नसल्याचा मुद्दा मांडला. त्यावर न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे जाणून घेत याचिकाकर्त्याला या संदर्भात इतर  प्राधिकरणाकडे याचिका दाखल करू शकतात अशा सूचना दिल्या. तर विद्यापीठाला २०१५ ची नाव नोंदणी कायम ठेवण्याचा सूचना  दिल्या. न्या.आर.एम.बोरडे यांच्या खंडपीठात हा खटला चालला. विद्यापीठाकडून अ‍ॅड.इ.बी.गिरासे व अ‍ॅड.श्यामकांत भादलीकर यांनी काम पाहिले. तर याचिकाकर्त्यांकडून अ‍ॅड.गिरीश नागोरी यांनी काम पाहिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पदवीधर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.    

राज्यपालकांकडे याचिका दाखल करणार -अ‍ॅड.जमील देशपांडे न्यायालयाने याचिकाकर्ता अ‍ॅड.जमील देशपांडे यांना इतर प्राधिकरणाकडे याचिका दाखल करु शकतात अशा सूचना दिल्या. त्यानुसार या संदर्भात राज्यपालांकडे याचिका  दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.