शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

निकालाच्या बाबतीत ‘उत्तर महाराष्ट विद्यापीठ’ ठरले राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 13:27 IST

उत्तर महाराष्ट विद्यापीठाकडून मार्च ते मे महिन्यात विविध विद्याशाखाच्या घेण्यात आलेल्या  ७८३ परीक्षांपैकी ५८०  परीक्षांचे निकाल ३० तर २०३ परीक्षांचे निकाल ४५ दिवसाच्या आत जाहीर करणारे उमवि हे राज्यातील अग्रेसर विद्यापीठ ठरले आहे. मुंबई विद्यापीठाचे निकाल अद्याप जाहीर झाले नसताना उमविने  वेळेच्या आत निकाल जाहीर करून आपला स्वत:चा ‘उमवि पॅटर्र्न’ निर्माण केला आहे.       

ठळक मुद्देफास्टट्रॅक पध्दतीने  ७००  हुन अधिक विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन  उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी ११  केंद्रे   निर्माण केला ‘उमवि पॅटर्र्न’

निकालाच्या बाबतीत ‘उत्तर महाराष्ट विद्यापीठ’ ठरले राज्यात अव्वल

आॅनलाईन लोकमत,

जळगाव, दि.२३,उत्तर महाराष्ट विद्यापीठाकडून मार्च ते मे महिन्यात विविध विद्याशाखाच्या घेण्यात आलेल्या  ७८३ परीक्षांपैकी ५८०  परीक्षांचे निकाल ३० तर २०३ परीक्षांचे निकाल ४५ दिवसाच्या आत जाहीर करणारे उमवि हे राज्यातील अग्रेसर विद्यापीठ ठरले आहे. मुंबई विद्यापीठाचे निकाल अद्याप जाहीर झाले नसताना  उमविने  वेळेच्या आत निकाल जाहीर करून आपला स्वत:चा ‘उमवि पॅटर्र्न’ निर्माण केला आहे.      विद्यापीठात  विविध  विद्याशाखेअंतर्गत  मार्च ते मे महिन्यात घेण्यात आलेल्या ७८३ परीक्षांमध्ये  १ लाख ५८ हजार विद्यार्थी बसले होते. १७ मार्च ते  ६ जून या ८२ दिवसाच्या  कालावधीत या सर्व परीक्षा पार पडल्या. यामध्ये एम.ए., एम.कॉम., विधी,  अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी व पदव्युत्तर या  अभ्यासक्रमांच्या १ हजार ६६५ विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे वितरण उमविकडून आॅनलाईन  पध्दतीने करण्यात आले. तर उर्वरीत अभ्यासक्र्रमांच्या प्रश्नपत्रिका  परीक्षा केंद्रावर  पोहचविण्यात आल्या. यासाठी कुलगुरु प्र्रा.पी.पी.पाटील यांनी प्रारंभापासून परीक्षांचे  निकाल वेळेवर लागावेत यासाठी प्रयत्न केले आहेत.     फास्टट्रॅक पध्दतीने  ७००  हुन अधिक विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन  विद्यापीठाने वेळेवर  निकाल लावण्यासोबतच यंदा प्रथमच निकाल जाहीर झाल्यानंतर  पुनर्मूल्यांकनासाठी ‘फास्टट्रॅक’ पध्दतीने ७०० हुन अधिक विद्यार्थ्यांचे निकाल  पुनर्मूल्यांकन केले आहेत. अनेकदा विद्यार्थी एखाद्या विषयात नापास झाल्यास विद्यार्थ्यांचा पुनर्मूल्यांकनासाठी तीन महिन्याहून अधिक वेळ जायचा  यामुळे  विद्यार्थ्यांचा निकाल उत्तीर्ण लागल्यावर देखील विद्यार्थ्यांचे वर्ष वाया  जात होते. मात्र विद्यापीठाने यंदा ‘फास्टट्रॅक’ पध्दतीने  पुनर्मूल्यांकन करून विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा  हिताचा निर्णय घेतला आहे.     उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी ११  केंद्रे  परीक्षांचे निकाल वेळेवर लागावेत यासाठी विद्यापीठाकडून परीक्षा  व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.डी.एन.गुजराथी यांच्या सहकार्याने उत्तरपत्रिकांचे मूल्यांकनासाठी खान्देशात  विविध ठिकाणी ११  केंद्रे  निश्चित केली. यामध्ये  धुळे जिल्ह्यात ६, नंदुरबार जिल्ह्यात व जळगावमध्ये ४ केंद्राचा समावेश  आहे. विद्यापीठामध्ये होत असलेल्या या बदलांचे विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.