शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

उमविचा ‘कन्सोर्टियम’ प्रकल्पामध्ये समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 22:07 IST

पोलंड, पोतुर्गाल, सायप्रस, स्लोव्हाकिया व बेल्जियम या पाच युरोपियन देशातील प्रत्येकी एक विद्यापीठ व भारतातील पाच विद्यापीठे यांचा समावेश असलेल्या ‘इरास्मस प्लस’ या युरोपियन देशांच्या योजनेद्वारे साकारणाºया कन्सोर्टियम प्रकल्पामध्ये उमविचा समावेश झाला आहे. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.

ठळक मुद्दे‘इरास्मस प्लस’ योजनेशी करार प्राध्यापकांना युरोपियन विद्यापीठात जाण्याची संधीआॅनलाईन अभ्यासक्रमांसाठी वेब प्लॅटफॉर्म विकसित होणार

आॅनलाईन लोकमत,

जळगाव-दि.१८,पोलंड, पोतुर्गाल, सायप्रस, स्लोव्हाकिया व बेल्जियम या पाच युरोपियन देशातील प्रत्येकी एक विद्यापीठ व भारतातील पाच विद्यापीठे यांचा समावेश असलेल्या ‘इरास्मस  प्लस’ या युरोपियन देशांच्या योजनेद्वारे साकारणाºया कन्सोर्टियम प्रकल्पामध्ये उमविचा समावेश झाला आहे.  कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. 

सप्टेंबर, २०१५ मध्ये माजी कुलसचिव प्रा.ए.एम.महाजन यांनी वास्लो, पोलंड येथील विद्यापीठास भेट दिल्यानंतर दोन्ही विद्यापीठात सामंजस्य करार झाला होता व त्या आधारे वास्लो विद्यापीठ सहकार्य करत असलेल्या कन्सोर्टियम प्रकल्पामध्ये उमविला सहभागी केले होते. गेल्या एक वर्षापासून प्रा.महाजन व डॉ.जे.एस.सरदार हे सातत्याने कॅबसीन या कन्सोर्टियम प्रस्तावाबद्दल पाठपुरावा करत होते. या प्रकल्पाची निवड ब्रुसेल येथे इरास्मस फंडींगसाठी ७४५ पैकी गुणवत्तेच्या आधारे १२७ प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा शैक्षणिक संशोधनाचा दर्जा उंचावण्यासाठी या प्रकल्पाचा मोठा उपयोग होणार आहे.

काय होणार फायदा  या महत्वाच्या प्रकल्पात उत्तर महाराष्टÑ विद्यापीठासह भारतातील पाच विद्यापीठांचा समावेश आहे.  सात कोटी रुपयांच्या निधीने साकारणाºया या प्रकल्पातंर्गत क्षमता विकसित केंद्र्र (कॅबसीन) स्थापन केले जाणार आहे. हे केंद्र अद्ययावत व आंतरराष्ट्रीय स्तरावरील राहणार असून यामध्ये आॅनलाईन अभ्यासक्रमांसाठी वेब प्लॅटफॉर्म विकसित होणार आहे. यासाठी विद्यापीठातील पाच शिक्षकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल. या केंद्राचा उपयोग प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी होणार असून विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचा देखील यात सहभाग असेल. याद्वारे  व्हीडिओ लेक्चर, नोटस, प्रेझेंटेशन असाइनमेंट विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना  प्राध्यापकांमार्फत उपलब्ध करता येईल.  या प्रकल्पांतर्गत प्राध्यापक व कर्मचाज्यांना प्रातिनिधिक स्वरुपात युरोपियन विद्यापीठात जाण्याची संधी प्राप्त होईल.