शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
3
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
4
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
6
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
7
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
8
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
9
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
11
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
12
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
13
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
14
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
15
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
16
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
17
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
18
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
19
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
20
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 

सद्भावना रॅलीतून अहिंसा, एकतेचा संदेश

By admin | Updated: April 7, 2017 18:33 IST

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव : विविध स्पर्धाना प्रतिसाद

जळगाव : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त  काढण्यात आलेल्या सद्भावना(दुचाकी) रॅलीद्वारे  अहिंसा, बंधुता व एकतेचा संदेश देण्यात आला. या रॅलीमध्ये समाजबांधवांनी मोठय़ा संख्येने सहभागी होत भगवान महावीर स्वामींचा जयघोष केला. जैन धर्मियांचे 24वे र्तीथकर भगवान महावीर स्वामी यांच्या  जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये शुक्रवारी सकाळी काढण्यात आलेल्या सद्भावना रॅलीने लक्ष वेधून घेतले.  सकाळी साडेआठ वाजता  शिवाजीनगरमधील श्री शांतीनाथ दिगंबर जैन (लाल) मंदिरापासून या रॅलीस सुरुवात झाली.  शास्त्री टॉवर चौक, चित्रा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ख्वॉजामिया चौक, रिंग रोड, बहिणाबाई उद्यान, मू.जे. महाविद्यालय, जिल्हाधिकारी बंगला, काव्यरत्नावली चौक, धर्मनाथ मंदिर, आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, बसस्थानक, स्टेट बँक चौक मार्गे बालगंधर्व सभागृहाजवळ रॅलीचा समारोप झाला.  रॅलीच्या अग्रभागी उघडय़ा जीपवर भगवान महावीर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. त्यापाठोपाठ केशरी साडय़ा, ड्रेस परिधान केलेल्या महिला व त्यामागे पांढ:या वस्त्रामध्ये पुरुष मंडळी दुचाकीवर स्वार होऊन भगवंतांचा जयघोष करीत ही रॅली निघाली. रॅलीमार्गावर जागोजागी रांगोळ्य़ा काढून रॅलीचे स्वागत करण्यात आले. विशाल चोरडिया, सुधीर बाझल, मनीष लुंकड आदींनी परिश्रम घेतले. स्पर्धेस प्रतिसादजैन युथ फोरम यांच्या सहयोगाने घेण्यात आलेल्या पॉवर पॉईंट स्पर्धेला प्रतिसाद मिळाला. यामध्ये शांतीनाथ ग्रुप प्रथम, धर्मनाथ ग्रुप द्वितीय तर महावीर ग्रुप तृतीय ठरला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून तेजल ओझा, शीतल जडे यांनी काम पाहिले. अनिल सांखला, विपीन चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष गांधी, आकाश चोपडा, सिद्धार्थ डाकलिया, प्रियंका मुथा, निशा मुथा यांनी परिश्रम घेतले. या सोबतच अरिहंत मार्गी महिला मंडळ यांच्या सहयोगाने भगवान महावीर चरित्र गाथा स्पर्धा व सप्तधान्य स्पर्धा घेण्यात आली. ललित श्रीश्रीमाळ, सुनंदा सांखला, आशा कावडिया आदी उपस्थित होते. त्यानंतर श्रद्धा मंडळाच्या सहयोगाने घेण्यात आलेल्या भगवान महावीर यांच्या जीवन चरीत्रावरील कविता स्पर्धेलाही प्रतिसाद मिळाला. यासाठी उषा समदडिया, मीना राका, मीनल समदडिया, शीतल जैन यांनी परिश्रम घेतले. आज महोत्सवातभगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त  8 रोजी सकाळी साडेसात वाजता ट्रेझर हंट स्पर्धा, 9 वाजता पांझरा पोळ येथे गो मातांना लापसी भोग, दुपारी 2 ते 5 नवकार महामंत्र जाप, संध्याकाळी सात वाजता बालगंधर्व नाटय़गृहात नाटिका सादर होईल.