धुळे : महापालिका स्थायी समितीचे सभापती चंद्रकांत सोनार यांच्या कार्यकाळातील अखेरची सभा गुरुवारी पार पडली़ शहरातील वाहनांवर वर्दळ कर लावण्याचा विषय नामंजूर करण्यात आला, तर नगरोत्थान योजनेतील एका कामावर सदस्यांनी आक्षेप घेतल्याने त्या कामाबाबत दोन व तीन क्रमांकावरील ठेकेदारांना चर्चेसाठी बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला़ स्थायी समिती सभापती चंद्रकांत सोनार यांच्या कार्यकाळातील अखेरची सभा गुरुवारी झाली़ आयुक्त डॉ़नामदेव भोसले जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी गेल्याने ते सभेस अनुपस्थित होत़े सभापतींसह उपायुक्त हनुमंत कवठळकर व प्ऱनगरसचिव मनोज वाघ यांनी सभेचे कामकाज पार पाडल़े सभेच्या अजेंडय़ावर असलेला मालेगाव रोड जीएसआर टाकी येथील पंपिंग स्टेशनच्या इमारतीचे रूम नं़ 1 ते 3 र्पयतच्या दुरुस्तीच्या कामास कार्योत्तर मंजुरी देण्याच्या विषयास मंजुरी देण्यात आली़ तसेच वडजाई रोड भागात धार्मिक इस्तेमासाठी बसविण्यात आलेल्या पथदिव्यांसाठी आलेल्या 49 हजार 782 रुपयांच्या खर्चासही कार्योत्तर मंजुरी देण्यात आली़ आरोग्य विभागासंबंधी विषयास मंजुरी देण्यात आली़ त्याचप्रमाणे क्षयरोग अधिकारी यांच्या वाहनाबाबतचा विषयही मंजूर झाला़ मनपा हद्दीतील खाजगी वैद्यकीय रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅबची नोंदणी करण्याचा विषय महासभेचा असल्याचे सांगत सभापतींनी तो रद्द ठरविला़ आरएनटीपीसी सुपरवायझर्स यांना इंधन भत्ता देण्याचा विषयही मंजूर करण्यात आला़ मनपा हद्दीत दाखल होणा:या वाहनांच्या वर्दळीवर कर लावण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सभेत ठेवला होता़ मात्र या विषयावर नगरसेवक नरेंद्र परदेशी, संदीप पाटोळे, अमोल मासुळे यांनी आक्षेप घेतला़ वाहन करामुळे नागरिकांना मोठा फटका बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने हा विषय नामंजूर करण्यात आला़ तर जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी कौटुंबिक न्यायालयासाठी भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून देण्याबाबत पत्र दिल्याने हा विषय अजेंडय़ावर घेण्यात आला होता, तो मंजूर करण्यात आला़ एलबीटी विवरणपत्र तपासणीचा विषयही मंजूर झाला़ नगरोत्थान योजनेत मंजूर झालेल्या रस्त्यांच्या 13 कामांच्या निविदांना डोळे मिटून मंजुरी देण्यात आली़ परंतु शंभरफुटी रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याच्या कामासाठी ठेकेदार ए़बी़ वाघ यांनी सर्वात कमी 20़51 टक्के कमी दराची निविदा सादर केली होती़ मात्र त्यांच्या या निविदेबाबत अन्य ठेकेदार कंपन्यांनी तक्रारी केल्या होत्या़ तर कटारिया व गिते या ठेकेदारांच्या निविदा अपात्र ठरविण्यात आल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आह़े त्यामुळे या कामाच्या विषयावरून नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी आक्षेप घेतला, त्यांनी ही निविदा रद्द करण्याची मागणी केली़ उलटपक्षी नगरसेवक चंद्रकांत केले यांनी ही निविदा मंजूर करण्याची मागणी केली़ या विषयावरून परदेशी व केले यांच्यात किरकोळ शाब्दिक चकमकही झाली़ अखेर सभापती चंद्रकांत सोनार यांनी हस्तक्षेप करीत वाघ यांची निविदा मंजूर न करता तसेच फेरनिविदादेखील न मागविता दुस:या व तिस:या क्रमांकावरील ठेकेदारांना चर्चेसाठी बोलाविण्याचे आदेश दिल़े नगरसेवक संदीप पाटोळे यांनी अग्निशमन दलातील 101 या क्रमांकावर तत्काळ प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार केली़ अग्निशमन विभागाचे बंब उशिरा पोहचत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली़ अखेर सभापती सोनार यांनी संबंधित अधिका:यांना कामात तत्परता दाखविण्याचे आदेश दिल़े
वर्दळीवर कर नाहीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2016 00:22 IST