भडगाव तालुक्यातील नुकसानीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. खासदार उन्मेष पाटील यांच्या आदेशाने तहसील कार्यालयात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबत महसूल आणि कृषी विभागाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीबाबतचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. आज खासदार उन्मेष पाटील यांनी संबंधित यंत्रणेला फक्त नदीकिनारी असलेल्या नुकसानग्रस्तांसोबत संततधार पावसामुळे गावात नुकसान झाले असेल तर त्याचादेखील पंचनामा करावा. कुंभार, चांभार असो वा लोहार यासारखे लहान-मोठे व्यावसायिक, विविध आस्थापना या नुकसानग्रस्त नागरिकांना जास्तीत जास्त भरपाई कशी मिळेल याकडे लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.
बैठकीला तहसीलदार मुकेश हिवाळे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती पोपट भोळे, भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा पाटील, गटविकास अधिकारी आर.ओ. वाघ, मुख्याधिकारी रवींद्र लांडे, पाचोरा गटविकास अधिकारी अतुल पाटील, तालुका कृषी अधिकारी बी.बी. गोरडे, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा पत्रकार सोमनाथ पाटील, पाचोरा भाजप अध्यक्ष अमोल शिंदे, भडगाव भाजप तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉ. संजय पाटील, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष विनोद हिरे, माजी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नितीन महाजन, विनोद पाटील, प्रवीण पाटील, अशोक परदेशी, पत्रकार नरेंद्र पाटील, सुधाकर पाटील, जावेद शेख, शुभम सुराणा, कुणाल पाटील उपस्थित होते. तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी आभार व्यक्त केले.
040921\04jal_8_04092021_12.jpg
भडगाव तहसिल कार्यालयात अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलताना खासदार उन्मेश पाटील, बाजूला तहसिलदार मुकेश हिवाळे, पोपट भोळे, आर. ओ. वाघ, बी. बी. गोरडे, रविंद्र लांडे आदी.