भुसावळ : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सद्य:स्थितीला कोरोना लाट ओसरत जरी असली तरी १५ जून शाळेच्या पहिल्याच दिवशी नेहमीप्रमाणे शाळेची घंटा न वाजता ऑनलाइनवरच शिक्षण विभागाला व सद्य:स्थितीत व नजीकच्या काळातही शाळेची घंटा वाजण्याची शक्यता दिसून येत नाही.
भुसावळ शहर व तालुक्यामध्ये एक ते बारा या वर्गामध्ये तब्बल ६० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, याकरिता प्राथमिकला २२७, तर माध्यमिकला सुमारे ६०० शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहेत. १५ रोजी शिक्षण विभागातर्फे स्वाध्याय, दीक्षा ॲप व यूट्यूब कशा पद्धतीने शिक्षणासाठी हाताळावे याबाबत विद्यार्थ्यांना शिक्षकांनी माहिती दिली, असे शिक्षण विस्तार अधिकारी बळीराम साळी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.