शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

मनपाचे स्वच्छ सर्वेक्षण केवळ कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 12:10 IST

हगणदरीमुक्ती केवळ नावापुरती

ठळक मुद्दे ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण नाहीच, एकत्रच लावली जाते विल्हेवाटअनेक भागांमध्ये नागरिक करतात उघड्यावरच शौच

जळगाव : केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत अंतर्गत सर्व शहरांचे ‘स्वच्छ सर्वेक्षण’ करण्यात येत असून, या सर्वेक्षणाव्दारे नागरिकांकडून आपल्या शहरातील स्वच्छतेच्या स्थितीबाबत माहिती घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ ने देखील शहराच्या स्वच्छतेबाबत सर्वेक्षण केले असता, शहरातील नागरिकांना स्वच्छतेबाबतच्या सुविधा या मिळत नसून, स्वच्छतेबाबत मनपाकडून केलेले दावे हे केवळ कागदापुरतेच मर्यादित असल्याचे ’लोकमत’च्या पाहणीत आढळून आले आहे.केंद्र सरकारकडून होत असलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ अंतर्गत नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर ‘लोकमत’ ने हे सर्वेक्षण केले. यामध्ये सध्या शहरातील स्वच्छतागृहांची असलेली सुविधा, स्वच्छता गृहांमधील स्वच्छता,कचराकुंड्यांची स्थिती, ओला व सुका कचºयाचे विलगीकरण करून त्या कचºयाची होणारी विल्हेवाट व शहरातील हगणदरीची स्थिती या मुद्यांचा आधारावर ‘लोकमत’ ने गुरुवारी शहरातील काही भागांमध्येजावून सर्वेक्षण केले.स्वच्छतागृहांची स्थिती विदारकशहराच्या लोकसंख्येचा तूलनेत शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या फारच कमी आहे. सध्या शहरात ७० स्वच्छतागृह आहेत. त्यापैकी ५० टक्के स्वच्छतागृहे ही मनपाच्या संकूलांमध्ये आहेत. गोलाणी मार्केटमधील स्वच्छतागृहांची पाहणी केली असता त्यातील निम्मे स्वच्छतागृह बंद असलेली आढळून आली. तर इतर स्वच्छतागृहांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी प्रवेश करणेही कठीण असल्याचे दिसून आले. सेंट्रल फुले मार्केटमध्ये चार स्वच्छतागृह आहेत. त्या ठिकाणची स्थिती वेगळी नाही. या मार्केटमधील काही स्वच्छतागृहे पाडून त्या ठिकाणी काही दुकानदारांनी आपले दुकाने तयार केलेले दिसून आले. कानळदा रस्त्यागत असलेल्या लक्ष्मीनगर भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची पाहणी केली असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून आली. त्यामुळे नागरिक स्वच्छतागृहांमध्ये न जाता उघड्यावरच शौच करतात.ओला व सुका कचºयाची एकत्रच लावली जातेय विल्हेवाटस्वच्छ शहराचा दर्जा प्राप्त करण्यासाठी शहरातील नागरिकांकडून ओला व सुका कचºयाचे संकलन करणे गरजेचे असते. मात्र,जळगाव शहरात नागरिकांकडूनच ओला व सुका अशा दोन प्रकारात कचरा न देता एकत्रच दिला जातो. विशेष म्हणजे सफाई कर्मचाºयांकडून देखील नागरिकांकडून ओला व सुका कचºयाची मागणी होत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच सर्व कचरा जमा केल्यानंतर विलगीकरण न करता तो कचरा आव्हाणे शिवारातील मनपाच्या बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी जमा केला जातो. याबाबतीत महापालिका स्वच्छ सर्वेक्षणात पात्र ठरत नसल्याचे दिसून येते.अनेक भागांमध्ये नागरिक करतात उघड्यावरच शौचजळगाव शहर कें द्र व राज्य समितीच्या पाहणीअंती हगणदरीमुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच ३१ डिसेंबर रोजी शहराचा हा दर्जा कायम आहे की नाही ? याबाबत राज्य समितीने केलेल्या फेरतपासणीत जळगाव महापालिकेने हगणदरी मुक्त शहराचा दर्जा कायम ठेवल्याचा अहवाल समितीने दिला आहे. तसेच जळगाव शहर ‘ओडीएफ प्लस’ साठी देखील पात्र ठरले आहे. मनपा व राज्य समितीने केलेल्या पाहणीत जरी जळगाव शहर हगणदरीमुक्त म्हणून घोषित झाले. असले तरी खरी परिस्थिती वेगळीच असल्याचे दिसून येत आहे.शहरातील अनेक भागांमधील नागरिक अजूनही उघड्यावरच शौच करत असल्याचे पाहणीत दिसून आले. मेहरूण, पिंप्राळा-हुडको, लक्ष्मी नगर, निमखेडी परिसर, शिवाजी नगर, तांबापुरा या भागात नागरिक उघड्यावर शौच करत असल्याचे दिसून येतात. यामध्ये काही भागात स्वच्छतागृह आहेत मात्र चांगल्या स्थितीत नसल्याने नागरिकांना नाईलाजास्तव उघड्यावर शौच करावे लागते. तर काही भागांमध्ये स्वच्छतागृह असूनही नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान