शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर उड्डाणपुलाबाबत मनपा रेल्वेला देणार प्रस्ताव

By admin | Updated: April 20, 2017 01:18 IST

रेल्वे उड्डाणपुलाचे काम रेल्वे व राज्य शासनाने निम्मा-निम्मा खर्च उचलून करण्यास मुख्यमंत्र्यांनी व रेल्वेमंत्र्यांनी मंगळवारी मंजुरी दिली.

जळगाव : १०४ वर्ष जुन्या ब्रिटीशकालीन रेल्वे उड्डाणपुलाचे काम रेल्वे व राज्य शासनाने निम्मा-निम्मा खर्च उचलून करण्यास मुख्यमंत्र्यांनी व रेल्वेमंत्र्यांनी मंगळवारी मंजुरी दिली. त्यामुळे या कामाला गती येणार असून या पुलाचे डिझाईन कसे असावे? यासाठी मनपाचे मत विचारात घेतले जाणार असल्याने मनपाकडून प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी सकाळी आयुक्त जीवन सोनवणे यांनी अधिकाºयांसह शिवाजीनगर उड्डाणपूल परिसरात भेट देऊन पाहणी केली. ममुराबाद रस्त्याला पुलाचा रस्ता जोडण्याचा प्रस्ताव देणारमनपाने २०१२ मध्ये या पुलाच्या नकाशांना रेल्वेकडून मंजुरी मिळविली होती. त्यात सध्या अस्तित्वात असलेल्या  डाव्या हाताने शिवाजीनगर, दूध संघाकडे जाणाºया रस्त्यासोबतच समोर थेट खाली शिवाजीनगरात आणखी एक रस्ता उतरविण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र त्यापेक्षा डाव्या हाताला जाणाºया रस्तासोबतच उजव्या बाजूने थेट ममुराबाद रस्त्याला पुलाचा रस्ता जोडण्याचे प्रस्तावित करण्यात येणार आहे. ख्रिश्चन धर्मियांची दफनभूमी या ठिकाणी असल्याने त्यांच्याशी चर्चा करून केवळ तीन पिलर टाकण्यासाठी जागा मागितली जाणार आहे. या पाहणीप्रसंगी नगररचना सहायक संचालक के.पी. बागुल, शहर अभियंता दिलीप थोरात आदी उपस्थित होते....तर शासनाची व रेल्वेची बदनामी होईलमनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने अनेक वर्षांपासून शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा विषय रखडला होता. रेल्वेने हा पूल धोकादायक झालेला असल्याने तो कोसळून जिवीत हानी होण्याची भिती असल्याने त्वरित नवीन उड्डाण पूल बांधण्याचे अथवा त्यावरील वाहतूक बंद करण्याचे पत्र मनपाला दिले होते. मनपाने त्यानुसार अवजड वाहतूक बंदही केली. मात्र तरीही हा पूल कोसळून रेल्वेवर पडल्यास जिवीत हानी होण्याची भिती कायम होती. त्यामुळे रेल्वेनेच राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला पत्र लिहून शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूलाची स्थिती धोकादायक आहे. सर्वंकष विचार करून या पुलासाठी निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जर काही अनुचित घडले तर रेल्वे व शासनावरच टीका होऊन प्रतिमा खराब होईल, असे पत्र दिले                   होते. मनपाने देखील राज्य शासनाला रेल्वे मंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्या बैठकीच्या पाश्वभूमीवर पाठविलेल्या अहवालात हे पत्र जोडून त्यातील हा मुद्दा ठळक करून पाठविला होता. त्यामुळेही शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका दाखविल्याचे मानले जात आहे.