शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कोणत्याही क्षणी होवू शकते महापालिकेचे बॅँक खाते सील !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 11:21 IST

‘डीआरएटी’ ने डिक्री रद्दचे अपील फेटाळले

ठळक मुद्दे प्रशासन अंधारात

जळगाव : हुडकोकडून कर्जापोटी डिआरटी कोर्टाने मनपास ३४१ कोटी रुपये कर्ज भरण्यासंदर्भात हूकमनामा (डिक्री) दिला होता. यानिकाला विरोधात मनपाने दाखल केलेले अपील कोर्टाने फेटाळून लावले आहे, त्यामुळे कोणत्याही क्षणी हुडकोकडून मनपाचे बॅँक खाते सील होण्याची शक्यता आहे.मंगळवारी मनपात झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी ही धक्कादायक माहिती देताना हुडकोकडून केव्हाही बॅँक सील करण्याची किंवा मनपाच्या मिळकती ताब्यात घेण्याची कारवाई देखील होण्याची भीती व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणी स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी मनपा उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करणार असल्याची माहिती दिली.मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांना माहितीही नाहीनितीन लढ्ढा यांनी ही डीक्री रद्दचे अपील फेटाळल्याची माहिती स्थायी समितीच्या सभेत दिली. मात्र, या सुनावणीदरम्यान ही याचिका फेटाळण्यात आली. याबाबत सत्ताधारी किंवा मनपा प्रशासनाला देखील कोणतीही माहिती दिसून आली नाही. तसेच लढ्ढांकडून ही माहिती सभेत दिली जात असताना काही भाजपा सदस्यांनी या विषयावर गांभिर्याने न घेता जुन्या सत्ताधाºयांना दोष देण्यातच धन्यता मानली. या विषयावर सभेत चर्चा होणे गरजेचे होते. तसेच डिक्री रद्दची अपील फेटाळण्यात आल्यामुळे आता संभाव्य जप्ती रोखण्यासाठी मनपाकडून होणाºया उपायोजनांबाबत देखील कोणतीही चर्चा सभेत झाली नाही.काय आहे प्रकरण1 सन २००१ मध्ये हुडकोने हे कर्ज एनपीए घोषीत केले होते. त्यानतंर सन २००४ मध्ये कर्जाचे रिसेटलमेंट करण्यात आले. मात्र त्यानुसार देखील महापालिकेने फेड केली नाही. कर्जफेड होत नसल्याने हुडकोने याप्रकरणी डिआरटी कोर्टात सन २०११ मध्ये याचिकाही दाखल केली आहे. त्यावेळी हुडकोने पुन्हा ३४० कोटी रुपयांची मागणी केली होती.2 सन २०१२ मध्ये ठरल्यानुसार कर्जफेडीचा पहिला १२९ कोटीचा हप्ता मनपाने भरला नाही. त्यामुळे तारण असलेली सतरामजली इमारत व गोलाणी संकुलाच्या लिलावाची नोटीस डीआरटी कोर्टाने काढली होती. त्यानतंर ७ आॅगस्ट २०१४ रोजी महापालिकेची खाती डिआरटीच्या आदेशाने सील केली होती.3 दीड महिन्यानंतर मनपाने दाखल केलेल्या याचिकेनुसार ही खाती मोकळी करण्यात आली. त्यानतंर उच्चन्यायालयाच्या आदेशाने एकरकमी प्रकीया सुरु करण्यात आली. हुडकोच्या थकीत कर्जफेडीच्या हप्तायासाठी मुंबईच्या डिआरटी कोर्टाने जळगाव मनपाला ३४० कोटी ७४ लाख ९८ हजार ६२७ रुपये २९ पैसे पंधरा दिवसात भरण्याचे आदेश डिक्री नोटीसव्दारे दिले हेते. विशेष म्हणजे या रक्कमेवर हुडकोने दावा दाखल केलेल्या तारखेपासून १२ टक्के व्याज प्रतिवर्ष देण्याचे देखील या आदेशात म्हटले होते.4 महापालिकेने आदेशाला स्थगिती मिळविण्यासाठी डिआरएटीकडे अपील दाखल केले होते. मात्र, सोमवारी सुनावणीत डिआरएटी ने मनपाचे अपील फेटाळल्याने हुडकोला आता ३४१ कोटी वसुलीसाठी मनपाचे बॅँक सील करणे किंवा मिळकतींवर ताबा मिळवण्याची मुभा मिळवली आहे.डिआरएटी कोर्टाने मनपाचे अपील फेटाळले असले तरी उद्या मनपाच्या वकीलांकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हुडकोकडून एकरकमी कर्जफेड करण्याचा प्रयत्न आमच्याकडून राहणार आहे. -सुरेश भोळे, आमदारडिआरएटी कोर्टाच्या निर्णयानंतर उच्च न्यायालयात पुर्नसंचयन अर्ज दाखल केला जाणार आहे. तसेच एकरकमी कर्जफेडीचा पर्याय देखील मनपाकडे उपलब्ध आहे. याबाबत मनपाच्या वकिलांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. -चंद्रकांत डांगे, आयुक्त, मनपा