कुठल्याही कारणांनी चर्चेत राहणे हे जिल्हा परिषदेचे वैशिष्ट कोरोना काळात निधीच नाही, निधी नाही असे सांगत कामांपासून दूर राहणाऱ्या यंत्रणेला जिल्हा प्रशासनाने मोठा दणका दिला आहे. निधीसाठी राजकीय प्रशासकीय सर्व दारे ठोठावणारे अधिकारी आणि पदाधिकारी आता कुणाकडे आणि कसा निधी मागणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. पैसा असताना नियोजन नसते, दरवर्षी मोठा निधी शासनजमा हाेतो. अधिकारी नियाेजन करीत नाही, म्हणून पदाधिकारी ओरड करतात. दुसरीकडे सदस्य त्यांनाच कामे मिळावी म्हणून धडपड करतात अशी चर्चा दबक्या आवाजात जिल्हा परिषदेत होत असते. मात्र, सामान्य माणुस मात्र विकासापासून कोसोदूर जात असल्याचे कोणालाही सोयरसूतक नाही. आम्ही पक्षाशी बांधील तेव्हाच जेव्हा पद कायम पद नसले तर आम्ही पक्ष सोडू शकतो, असा संदेश जिल्हा परिषदेतील निवडणुकांनी दिला आहे. गैरव्यवहार आणि भोंगळ कारभारावर दाेन किंवा तीन सदस्य पोटतिटकीडीेन आवाज उठवतात. तेव्हा पक्ष हा विषय नसतो. अनेक वेळा सत्ताधारी असतानाही ते सामान्यांसाठी पक्षाचा विरोध पत्करायला तयार असतात. मात्र, यात अनेक चेहरे असे आहेत की, जे आधी अत्यंत घाणाघाती टीका सत्तेत असतातना सत्ताधाऱ्यांवर करायचे उद्देश एकच कामे, मात्र, हाच आवाज आता दाबला गेला आहे. त्यामुळे हे नेमके कोणते राजकारण हाही जिल्हा परिषदेत नेहमी चर्चेचा मुद्दा असतो. सध्या सर्वात चर्चेचा मुद्दा निधी असून गेल्या काही वर्षात कामांचे नियोजन न करणे जिल्हा परिषदेला या कोरोना काळात अनेक वर्ष मागे घेऊन जाणारे असेल.
निधी हाय कामाचे काय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:41 IST