शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जळगावपाठोपाठ धरणगाव, जामनेर नगर परिषदला देणार मोफत लाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने परिसरातील अवजड व जळाऊ लाकडे जळगाव महानगरपालिकेसोबतच धरणगाव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने परिसरातील अवजड व जळाऊ लाकडे जळगाव महानगरपालिकेसोबतच धरणगाव व जामनेर नगर परिषद, धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द व पाळधी बु. आणि बांभोरी ग्रामपंचायतीलादेखील मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मृत्युसंख्येत झालेली वाढ पाहून सामाजिक बांधिलकीतून विद्यापीठाने अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत लाकडे कमी पडू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठ परिसरात अंदाजे ही १५० ते २०० टन लाकडे आहेत. कोरोनाच्या सद्य:स्थितीत स्मशानभूमीत लाकडे कमी पडू लागली आहेत. त्यामुळे प्रभारी कुलगुरु प्रा.ई. वायुनंदन यांच्या पुढाकाराने जळाऊ लाकडे जळगाव महानगरपालिकेकडे मोफत सुपुर्द करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार महापालिकेने स्वत:च्या वाहनाने लाकडे उचलण्याची कार्यवाही सुरू केली. दरम्यान, धरणगाव व जामनेर नगर परिषद आणि धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द व पाळधी बु. ग्रामपंचायतीनेदेखील विद्यापीठाकडे लाकडे देण्याची मागणी केली. विद्यापीठाने या मागणीचा विचार करून या तिन्‍ही ठिकाणी स्मशानभूमीतील दैनंदिन वापरासाठी मोफत लाकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली.

- कोट

कोरोनाच्या काळात मृतांची संख्या वाढली असून, स्मशानभूमीत लाकडे कमी पडू नयेत यासाठी जळगाव महानगरपालिका, धरणगाव, जामनेर नगर परिषद आणि पाळधी व बांभोरी ग्रामपंचायतीला लाकडे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. हे विद्यापीठ संकटाच्या काळात समाजाच्या मदतीला नेहमीच धावून जात असते. तोच पायंडा यावेळीदेखील कायम ठेवण्यात आला.

- प्रा. डॉ. ई. वायुनंदन, प्रभारी कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ