शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

वार्तापत्र क्राईम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:42 IST

तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला पोटचा गोळा अचानक सोडून गेल्यानंतर त्या मातेची काय अवस्था होते हे फक्त ती माताच सांगू शकते...एखादी ...

तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला पोटचा गोळा अचानक सोडून गेल्यानंतर त्या मातेची काय अवस्था होते हे फक्त ती माताच सांगू शकते...एखादी अल्पवयीन मुलगी गायब झाली असेल तर तिच्याबाबतीत अनुचित प्रकार घडला तर काय अवस्था होते, याचे महत्व मातेप्रमाणे खाकीच सांगू शकते. अशाच तीन नाजूक प्रकरणात मातांच्या ह्दयाची सुरु असलेली धगधग पाहता खाकीलाही माणुसकीचा पाझर फुटला अन‌् या मातापित्यांच्या जीव भांड्यात टाकण्याचे कार्य स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी केले आहे. गेल्या १९ महिन्यापासून जन्मदातीला सोडून पलायन केलेल्या तरुणीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी जळगाव शहरातून ताब्यात घेतले. इतकेच काय पालकत्वाची भूमिका निभावून तिचे समुपदेशन केले. नागपूर येथून घ्यायला आलेला मामा भाचीला पाहून ढसाढसा रडला. बहिणीचे कुंकू आधीच पुसले गेले आहे, त्यात पोटचा गोळा १९ महिन्यापासून गायब झाल्याने तिची अवस्था म्हणजे मरणासन्न झालेली असताना जळगाव पोलिसांनी या मुलीला तिच्या मामांच्या स्वाधीन केले. मुलीच्या आईला आनंदाची वार्ता कळविली. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, शरद भालेराव व नरेंद्र वारुळे या तिघांना भावनिक साद घालून मामाने जळगाव पोलीस दलाचे आभार मानायला शब्दच नसल्याचे सांगितले. हा प्रसंग म्हणजे चित्रपटात शोभेल असाच होता. याआधी देखील दोन तरुणांनी पळवून नेलेल्या बोदवडच्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी शोधून काढले व इंदूर येथून तिला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले. अवघ्या १२ वर्षाची मुलगी असल्याने या प्रकरणात जन्मदात्यांसह पोलीसही चिंतेत पडले होते. डोळ्यासमोर बोरखेड्याचे चित्र असल्याने पोलिसांची धाकधूक वाढली होती. खुद्द पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनीच या प्रकरणात लक्ष घातले. मुलगी सुखरुप मिळाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. याआधी देखील चाळीसगाव तालुक्यातील अशाच प्रकरणात पोलिसांनी संयमाने प्रकरण हाताळून पुण्यातून मुलीला ताब्यात घेऊन पालकांसमोर आणले. संवेदनशील प्रकरणे पोलिसांनी गांभीर्याने घेऊन हाताळले. खून, चोऱ्या, घरफोड्या यापेक्षाही भावनिक प्रश्न महत्वाचे असून त्यांना खाकीने स्पर्श करुन खाकीतील माणुसकीचे दर्शन घडविले. हे मोजक्या प्रकरणात झालेले असले तरी जिल्ह्यात असे खूप प्रकरणे आहेत, त्यात त्या-त्या अमलदारांनी गांभीर्यपूर्वक लक्ष घातले तर नक्कीच पोलिसांविषयी समाजात वेगळे चित्र निर्माण होईल.