शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वार्तापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:15 IST

विनाकारण रस्त्यावर येऊ नका, घरातच थांबा असे आवाहन केले जात असले तरी जळगाव शहरात काहींकडून त्याला हरताळ फासण्याचेच काम ...

विनाकारण रस्त्यावर येऊ नका, घरातच थांबा असे आवाहन केले जात असले तरी जळगाव शहरात काहींकडून त्याला हरताळ फासण्याचेच काम होताना दिसत आहे. मात्र, आता जिल्हा पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाने हाती घेतलेल्या ‘थेट रस्त्यावरच चाचणी’ मोहिमेमुळे काही प्रमाणात का होईना, पण विनाकारण फिरणाऱ्यांवर वचक बसणार आहे.

कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला आहे. त्यास रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून संचारबंदी लागू केली आहे. असे असतानासुध्दा अनेक जण विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना आढळून येतात. परंतु, आता विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच अँटिजन टेस्ट केली जाणार आहे. त्यात पॉझिटिव्ह आढळणाऱ्या व्यक्तीस लागलीच कोविड केअर सेंटर येथे उपचारार्थ दाखल केले जाईल. परिणामी, त्या बाधितामुळे इतर कुणालाही कोरोनाची लागण होणार नाही. सद्यस्थितीला कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढल्यामुळे नागरिकांमध्‍ये भीती निर्माण झाली आहे. यामुळे काही जण रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठीदेखील जात नाही. पण, आता विनाकारण फिरणाऱ्यांची थेट रस्त्यावच अँटिजन टेस्ट केली जाणार असल्यामुळे रात्रीच्या वेळी संचारबंदीत फिरणाऱ्यांवर पोलिसांचा चांगलाच वचक बसणार आहे. त्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या तर कमी होईल. पण चाचणी केल्यामुळे पॉझिटिव्ह आढळून आलेल्या व्यक्तीकडून इतर कुठल्याही व्यक्तीला लागण होणार नाही. अर्थात कोरोनाची चेन तोडण्यास मदत होईल. पोलिसांनी राबविलेली ही मोहीम सुरूच ठेवावी, असेही काही तज्ज्ञांचे म्हणणे. दररोज हजारावर कोरोनाबाधित आढळून येत आहेत. दुसरीकड़े बरे होणाऱ्यांचे प्रमाणसुद्धा समाधानकारक आहे.