शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवेचा अभाव असलेल्या अफ्रिकेत रुग्णांना नवदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:07 IST

रोटरीचा पुढाकार : उपचाराने दृष्टी गेलेले पुन्हा पाहू शकले सृष्टी

ठळक मुद्देभारतातून एकूण २८ डॉक्टरांची निवडअफ्रिकेतील कॅमेरुन येथे १० दिवसीय मेडिकल मिशनचे आयोजनदोन ते पाच वर्षे वयाच्या बालकांनाही मोतीबिंदू

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२९ : आरोग्य सेवेअभावी वर्षानुवर्षे मोतीबिंदूचा त्रास सहन करीत दृष्टी गमावण्याची वेळ आलेल्या अफ्रिकेतील कॅमेरून देशात रोटरीच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या शिबिरात एकूण ८०० शस्त्रक्रिया होऊन ४०० डोळ््यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याने तेथील रुग्णांना नवदृष्टी मिळाली आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात समावेश असलेल्या डॉक्टरांमध्ये रोटरी क्लब आॅफ जळगाव ईस्टचे सदस्य डॉ.पंकज शहा या एकमेव नेत्रविकार तज्ज्ञांचा समावेश होता व त्यांनी ४०० शस्त्रक्रिया केल्या हे विशेष.रोटरी क्लब पानिपत आणि रोटरी इंटरनॅशनल यांच्यावतीने अफ्रिकेतील कॅमेरुन येथे रुग्णांवर उपचारासाठी १० दिवसीय मेडिकल मिशनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतातून एकूण २८ डॉक्टरांची निवड करण्यात आली व यामध्ये महाराष्ट्राचतील तीन डॉक्टरांचा समावेश होता. या तीनमध्येही एकमेव नेत्रतज्ज्ञ म्हणून जळगावातील डॉ. पंकज शहा यांचा समावेश होता.अफ्रिकेमध्ये आरोग्यसेवेचा अभाव असल्याने तेथे वेगवेगळ््या आजाराचे रुग्ण त्रस्त आहेत. अनेकजण तर अंथरुणाला खिळून असतात. त्यांना उपचार मिळणे कठीण असल्याने तेथे भारतातून गेलेल्या या पथकाने १० दिवस वेगवेगळे उपचार केले व आजारापासून दिलासा दिला.डोळ््यांच्या विकाराची तेथे मोठी समस्या आहे. विविध आजारासह मोतीबिंदूने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या मोठी असून शेकडो रुग्णांचे मोतीबिंदू पिकून अनेकांना दिसत नाही. विशेष म्हणजे यामध्ये मोठ्यासह दोन ते पाच वर्षे वयाच्या बालकांनाही मोतीबिंदू असल्याची गंभीर स्थिती अफ्रिकेत आहे. लहान वयातच दृष्टी गेल्याने त्यांच्यावर संकट ओढावले. यावर मात करण्यासाठी या पथकातील डॉ. पंकज शहा यांनी पुढाकार घेत १० दिवसात ४०० डोळ््यांच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या व लहानग्यांसह सर्वांना नवदृष्टी दिली.