शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

नांद्रा येथे दारूबंदीसाठी नव्याने ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 13:03 IST

20 दिवसांनी मतदान घेतले जाणार

ठळक मुद्दे काही तरतुदींचे पालन झाले नसल्याचा नकारात्मक अहवाल ग्रामसभेत ठराव करून मतदानही झाले दारू दुकान बंद करण्याची गावातील महिलांनी केली होती मागणी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 22 - तालुक्यातील नांद्रा बुद्रुक गावात दारू बंदीच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या मतदान व ठरावाच्या प्रक्रियेत नियमाच्या काही तरतुदींचे पालन झाले नसल्याचा नकारात्मक अहवाल राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांनी दिल्याने या दारू दुकानांवरील कारवाई टळली आहे.  दरम्यान ग्रामस्थांनी याबाबत सोमवारी उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यात आधीच्या प्रक्रियेत त्रुटी राहिल्याने दोन दिवसांत नव्याने 25 टक्के महिलांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिका:यांना देण्यात येऊन मतदानाची मागणी केली जाणार असून 20 दिवसांनी मतदान घेतले जाणार आहे. दारू दुकान बंद करण्याची मागणी गावातील महिलांनी केली होती. तसा ग्रामसभेत ठराव करून मतदानही झाले होते. मात्र राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांनी या ठरावाच्या व मतदानाच्या प्रक्रियेबाबत नकारात्मक अहवाल दिल्याने सोमवारी पं.स. समिती सदस्य हर्षल चौधरी, चुडामण वाघ, विलास चौधरी, कमलाकर सोनवणे, हिरामण वाघ, शरद सोनवणे, नरेंद्र पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, आदींनी उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे यांची भेट घेतली.