शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान अखेर जिंकला, पण संथ खेळीमुळे खड्ड्यात राहिला; १४ षटकांत जिंकायचं होतं, पण... 
2
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
3
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन दोषी, फेडरल गन प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
4
शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
5
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
6
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
7
स्पर्धेबाहेर होण्याच्या भितीने पाकिस्तानची कामगिरी सुधारली; जॉन्सनच्या तडाख्याने हुडहुडी भरली
8
Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!
9
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
10
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
11
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
12
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
13
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
14
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
15
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
16
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
17
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
18
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
19
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
20
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

जळगाव जिल्हा रुग्णालय परिसरात उभी राहणार नवीन निवासस्थाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 1:01 PM

फ्लॅट सिस्टीम बांधणार : निवासस्थाने खाली करण्यासाठी दुसरी नोटीस

ठळक मुद्देरहिवाशांना नोटीसकमी जागेत जास्त घरे

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 2 -  जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत झाल्यानंतर येथे मोठे बदल व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये आता येथील निवासस्थाने जीर्ण झाल्याने ते पाडून त्या ठिकाणी फ्लॅट सिस्टीमनुसार निवासस्थाने उभारण्यात येणार आहे. यासाठी येथील निवासस्थानात राहत असलेल्यांना दुसरी नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी निवासस्थान परिसरात जाऊन तेथे पाहणी केली. पहिली नोटीस मिळाल्यानंतर 30 ते 40 टक्के रहिवाशांनी निवासस्थान खाली केले असल्याचे सांगण्यात आले.  जळगावात मेडिकल हब उभारण्यासाठी जागा निश्चित झाली असली तरी त्याची इमारत उभी होईर्पयत वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालयातच सुरू होणार आहे. यासाठी जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले असून यामध्ये आवश्यक ते बदल केले जात आहे. रहिवाशांना नोटीससध्या जिल्हा रुग्णालाय परिसरात असलेल्या निवासस्थानी राहत असलेल्या रहिवाशांना हे निवासस्थान खाली करण्यासाठी  नोटीस देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी 84 अधिकृत निवासस्थाने असून 150 ते 200 अनधिकृत निवासस्थान तयार झाले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या एकूण 12 एकर जागेपैकी 6 एकर जागेत निवास्थानेच असून यासाठी जागा जास्त व्यापली गेली आहे. या ठिकाणी 60 टक्के रहिवासी निवृत्त झालेले तर कोणाची बदली होऊनही निवासस्थान खाली न केलेले आहे. त्यामुळे त्यांना  पहिली नोटीस देण्यात आली होती. यामध्ये 30 ते 40 रहिवाशांनीच निवासस्थान खाली केल्याने व उर्वरित तसेच असल्याने बुधवारी त्यांना दुसरी नोटीस देण्यात आली. तरीही ते खाली झाले नाही तर पोलीस व मनपाची मदत घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कमी जागेत जास्त घरेनिवासस्थानांमध्येच निम्मी जागा व्यापली गेल्याने रुग्णालयासाठी जागा कमी पडत आहे. त्यामुळे आता या ठिकाणी फ्लॅट सिस्टीमनुसार निवासस्थान उभारण्यात येणार असून पद, वर्गानुसार वन बीएचके पासून पुढे फ्लॅट उपलब्ध करून दिले जाणार आहे.

जिल्हा रुग्णालय परिसरातील सहा एकर जागा निवासस्थानासाठीच व्यापली गेली आहे. शिवाय या ठिकाणी अनेक अनधिकृत निवासस्थानही तयार झाले असून त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. - डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक. 

जिल्हा रुग्णालय परिसरात असलेली निवासस्थाने जीर्ण झाली असून अनेक जण निवृत्त व बदली होऊनही त्यांनी निवासस्थान खाली केलेले नाही. त्यामुळे त्यांना या विषयी नोटीस देण्यात आल्या असून प्रसंगी मनपा, पोलीस प्रशासनाची मदत घेण्यात येणार आहे. या ठिकाणी फ्लॅट सिस्टीमनुसार निवासस्थान होतील.  -डॉ. किरण पाटील, वैद्यकीय अधीक्षक.