शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जलप्रबोधन व जलव्यवस्थापनासाठी नवी चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 22:00 IST

भूजल अभियानांतर्गत ‘मिशन ५०० कोटी लीटर’ स्पर्धेची सुरुवात। चाळीसगाव तालुक्यात ६० गावांचा समावेश

संजय सोनार ।चाळीसगाव : तालुक्यात जलव्यवस्थापन व प्रबोधनासाठी चळवळ उभी राहिली आहे. पाणी फाऊंडेशनने सुरू केलेल्या समृद्ध गाव योजनेत समाविष्ट असलेल्या ४० तालुक्यांमध्ये चाळीसगावचा समावेश आहे. जलमित्र परिवारातर्फे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून गावे जलसमृद्ध करण्याचा प्रयत्न सुरू असून त्यास ग्रामीण भागातून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.गेल्या वर्षी जलसंधारणाची कामे तालुक्यात अनेक गावांमध्ये झाल्याने जागरूकता निर्माण झाली. चांगल्या प्रमाणात जलसाठा झाला. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत झाली. गेल्या वर्र्षीच्या स्पर्धेनंतर तालुका व गावागावातील जलमित्र, जलदूत व जलयोद्धे तयार झाले.डॉ.चव्हाण व गुणवंत सोनवणे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांची भेट घेत या कामाबद्दल माहिती दिली व मदतीचे आवाहन केले. यातून शिवनेरी फाऊंडेशन संचलित भूजल अभियान अंतर्गत ‘मिशन ५०० कोटी लिटर’ स्पर्धेची तालुक्यात सुरुवात झाली.डॉ.उज्वलकुमार चव्हाण यांच्या माध्यमातून जलमित्र परिवारातर्फे व ‘पाच पाटील’ यांच्या माध्यमातून प्रत्येक पाच पाटलांनी पाच गावांची पाण्यासाठी जबाबदारी घेणे अशी संकल्पना मांडून ‘मिशन ५०० कोटी लिटर’ची संकल्पना त्यांनी मांडली. त्या दिशेने प्रत्येक १५ दिवसांनंतर पाच पाटलांचे चर्चासत्र आयोजित करून ते मार्गदर्शन करतात. प्रत्येक पाच पाटलांमार्फत एक या गावाची जबाबदारी घेणारा गावप्रमुख गावात नाला खोलीकरणाचे काम करण्यासाठी ३० शेतकरी तयार करील. अशा शेतकऱ्यांकडून डिझेल खर्च घेतला जाईल. या माध्यमातून गावात पोकलेन मशीनद्वारे नाला खोलीकरणासारखी कामे करण्यात येतील. डॉ.चव्हाण हे तालुक्यात साधारण ३ वर्षापासून पाणी या विषयावर ते काम करत असून त्यांनी आतापर्यंत धामणगाव, रांजणगाव, शीदवाडी, कळमडू, कुंझर येथे जलसंधरणाचे उपक्रमम राबवले आहेत.३० गावांमध्ये जलप्रबोधनगुणवंत सोनवणे यांच्या ‘समुत्कर्ष परिवारा’मार्फत मेहुणबारे परिसरातील ३० गावांमध्ये जलप्रबोधनाचे काम सुरू आहे. प्रत्येक गावाचे डिजिटल जल आराखडे तयार करण्यासाठी गावातून १ जलदूत तयार करणे, गाव पाण्यासाठी स्वावलंबी करून गावात पाण्याचे संवर्धन व वितरण करणे हा यामागचा उद्देश आहे.१५ फेब्रुवारीपासून प्रशिक्षणभूजल अभियानाची पाण्यावर पूर्ण वेळ काम करणारी १० सदस्यांची टीम आहे. त्यांच्या मार्फत ११ पोकलेन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सध्या या स्पर्धेत ६० गावांचा समावेश केला असून या गावांचे २ दिवसीय निवासी प्रशिक्षण आभोने तांडा येथे १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तरी या प्रशिक्षणाचा लाभ आपल्या गावातील ३ ते ५ सदस्यांनी घ्यावा, तसेच याबाबत माहितीसाठी विजय कोळी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.