शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
2
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
3
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
4
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
5
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
6
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
7
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
8
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
9
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
10
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
11
बिहारमध्ये २०१० च्या इतिहासाची पुनरावृत्ती; नितीश कुमार अन् भाजपाने पुन्हा केली जबरदस्त कमाल
12
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
13
टायर किंग एमआरएफची दमदार कामगिरी; प्रत्येक शेअरवर मिळणार इतका लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
14
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
15
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! ५ विकेट्सचा डाव साधत सेट केले अनेक विक्रम
16
भरला संसार विस्कटून टाकला! आधी पत्नी अन् तीन मुलांना संपवलं; नंतर स्वतःचाही जीव घेतला
17
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
18
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
19
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
20
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

मतपत्रिकेवर मतदान टाळण्यासाठी नवीन ईव्हीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 12:43 IST

एका मतदार संघात उभे राहू शकणार ३८४ उमेदवार

सुशील देवकर जळगाव : देशभरात ईव्हीएमवरील मतदान घेण्यास विरोधकांकडून विरोध होत असतानाच अधिक उमेदवार उभे करून मतपत्रिकेवर मतदान घेण्यास भाग पाडण्याची हालचाल काही उमेदवारांनी सुरू केली होती. मात्र शासनाने अत्याधुनिक ईव्हीएमचा वापर सुरू केला असून त्यामुळे एका मतदार संघात ३८४ उमेदवार उभे राहिले तरी ईव्हीएमवर मतदान घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे ईव्हीएमविरोधातील हालचालींना खीळ बसली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.लोकसभा निवडणुकीत राज्यात अनेक ठिकाणी ६४ उमेदवार क्षमतेचे ईव्हीएम वापरले गेले होते. मात्र विधानसभेला सर्वच ठिकाणी अत्याधुनिक एम-३ ईव्हीएम वापरण्यावर भर जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानात घोळ होत असल्याचा विषय देशपातळीवर चर्चिला जात आहे. त्यासाठी काही मतदार संघांमधील विजयी व पराभूत उमेदवारांच्या मतांमधील फरकाचे आकडे देखील सारखे असल्याचे उदाहरणे दिली जात आहेत. निवडणूक आयोगाने हे सर्व आरोप फेटाळत मतपत्रिकांवर निवडणूक घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे विरोधकांकडून मतपत्रिकेवर निवडणूक व्हावी यासाठी वेगळीच शक्कल लढविली जात आहे.माजी आमदार अनिल गोटे यांनी ईव्हीएमला आव्हान देत मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी एकाच मतदारसंघातून थेट ३८५ उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी चालविली आहे. त्यांची यादी देखील तयार असल्याचे समजते.३८५ उमेदवार उभे करण्याची तयारीएका ईव्हीएम मशिनवर १६ उमेदवारांसाठी मतदान होऊ शकते. त्यात उमेदवार वाढल्यास त्यास आणखी ३ मशिन जोडता येत होती. म्हणजे चार मशिन जोडून ६४ उमेदवारांसाठी ईव्हीएमद्वारेच मतदान घेणे शक्य होते. २०१४च्या निवडणुकीत ही ६४ उमेदवारांसाठी मतदान घेण्याची क्षमता असलेले ‘एम-२’ग्रेडची यंत्रच वापरण्यात आली होती. मात्र त्यावेळी या मतदानयंत्रांबाबत राजकारण्यांमध्ये फारशी सजगता नव्हती. मात्र जेव्हा ईव्हीएमला विरोध सुरू झाला तेव्हा ६५ उमेदवार उभे करून मतपत्रिकेवर मतदान घेणे भाग पाडले जाऊ शकते, हे लक्षात आल्याने ही मर्यादा ३८४ उमेदवारांपर्यंत वाढवलेले ‘एम-३’ दर्जाचे आधुनिक ईव्हीएम गत लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आले. मात्र ही संख्या पुरेशी नसल्याने सोलापूरसह अनेक जिल्ह्यात जुनी एम-२ दर्जाची ईव्हीएम वापरण्यात आली. आता विधानसभा निवडणुकीसाठी देशभरातून अत्याधुनिक ईव्हीएम आणून त्याद्वारेच मतदान घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे २४ ईव्हीएम जोडले जाऊ शकतात. त्यामुळे ईव्हीएम विरोधकांना एका मतदारसंघात ३८५ उमेदवार उभे करावे लागणार आहेत.ईव्हीएमची क्षमता ३८४ उमेदवारांची असून ३८५ उमेदवार उभे केल्यास मतपत्रिकेवर मतदान होऊ शकते. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. -अनिल गोटे,माजी आमदार, धुळे.पूर्वी १६ उमेदवार क्षमतेचे ४ मशिन जोडून एका मतदार संघात ६४ उमेदवारांसाठी ईव्हीएमद्वारे मतदान घेतले जाऊ शकत होते. मात्र आधुनिक एम-३ प्रकारच्या ईव्हीएममध्ये २४ मशिन जोडून ३८४ उमेदवारांसाठी मतदान घेणे शक्य आहे. मतपत्रिका असो अथवा ईव्हीएम प्रशासनाला निवडणूक आयोगाच्या आदेशानुसारच निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.-डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव