शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात नेली गाय

By admin | Updated: August 1, 2014 15:23 IST

कत्तलखाना उभारणीला दुसर्‍या दिवशीही तीव्र विरोध करीत विविध संघटना व नागरिकांनी महापालिकेत आंदोलन केले. त्यात कळस गाठत शिवसेनेने गुरुवारी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात गाय नेली

धुळे : खासगी जमिनीवर कत्तलखाना उभारणीला दुसर्‍या दिवशीही तीव्र विरोध करीत विविध संघटना व नागरिकांनी महापालिकेत आंदोलन केले. त्यात कळस गाठत शिवसेनेने गुरुवारी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात गाय नेली आणि कत्तलखान्यास विरोध दर्शविला. याप्रश्नी दोन दिवसात दोन हजारांवर हरकती प्रशासनाकडे दाखल झाल्याआहेत. 

हाजी अब्दुल हमीद हाजी रहेमान यांनी स्व-मालकीच्या जागेत कत्तलखाना उभारण्याची महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. त्यास विरोध म्हणून शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त के.व्ही. धनाड यांच्या दालनात गाय नेली. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख भूपेंद्र लहामगे, नगरसेवक संजय जाधव, संजय गुजराथी, नरेंद्र परदेशी, शेखर वाघ, धीरज पाटील, संदीप सूर्यवंशी, नंदलाल फुलपगारे, चुडामण मोरे, जितेंद्र जगताप, राजेश पटवारी, अशोक जाधव आदींसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 
सौंदाणे ग्रामस्थांकडूनही हरकत
कत्तलखान्याप्रकरणी सौंदाणे ग्रामस्थांनीही विरोध दर्शवून हरकत घेतली आहे. ग्रामस्थांच्या, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकार्‍यांच्या सह्या असलेले निवेदन देण्यात आले आहे. 
शहरातील संवेदनशील वातावरण बघता कत्तलखान्याप्रकरणी मोठय़ा प्रमाणावर हरकती व विरोध झाला आहे. त्यामुळे महापालिका व अधिकार्‍यांच्या दालनासमोर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
 
कत्तलखानाप्रकरणी प्रशासकीय प्रक्रिया राबवून नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यावर मोठय़ाप्रमाणावर हरकती आल्याआहेत. या सर्व हरकती आयुक्तांपुढे सादर करण्यात येणार आहेत. -के.व्ही. धनाड, अतिरिक्त आयुक्त, मनपा 
 
हाजी अब्दुल हमीद हाजी अब्दुल रहेमान यांनी मनपाकडे १३ ऑगस्ट २0१३ रोजी कत्तलखाना सुरू करण्याची परवानगी मागितली होती. त्यावर मनपाने त्यांना विविध प्रदूषण नियंत्रण महामंडळाची परवानगी, मनपा बांधकामाची परवानगी, मालकी हक्क प्रमाणपत्र आणि परिसरातील नागरिकांच्या ना हरकती मागितल्या होत्या. त्यानुसार त्यांनी सर्व परवाने मनपाला सादर केल्यावर प्रक्रियेनुसार नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत.