शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव व भुसावळ तालुक्यातील वनजमिन विक्री घोटाळ्यातील दोषींपर्यंत पोहोचण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 16:09 IST

विश्लेषण

ठळक मुद्देसमिती करतेय चौकशी मात्र तक्रारदार पुढे येईना खरेदीखत नोंदीची माहिती मागवून कारवाईची गरज

सुशील देवकरजळगाव: जिल्ह्यातील जळगाव व भुसावळ तालुक्यातील भागपूर, कंडारी, उमाळे शिवार व परिसरातील वनविभागाच्या जमिनींची परस्पर विक्री केल्याचे प्रकार घडले असून आतापर्यंत सुमारे २२८८ एकर जमिनची अशाप्रकारे विल्हेवाट लावल्याचा संशय आहे. मात्र या घोटाळ्यात अद्याप कुणीही तक्रारदार पुढे आलेला नाही. चौकशी समिती चाकोरीत चौकशी करून अहवाल निपटण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र खऱ्या दोषींपर्यंत पोहोचून या १०० कोटींपेक्षा अधिक रक्कमेच्या घोटाळ्याची पाळेमुळे खणून काढण्याची गरज आहे.वनविभागाच्या जमिनी २०१३ च्या दरम्यान तत्कालीन तलाठी, सर्कल, तहसीलदार यांच्याशी संगनमत करून वनविभागाचाच गट नंबर, सर्व्हेनंबर वापरून ती जमीन अल्पभूधारक दर्शविलेल्या व्यक्तीच्या नावाची असल्याचे महसूल विभागाचा बोगस सातबारा उतारा तयार करून दर्शविले जायचे. त्यानंतर काही महिन्यातच त्या जमिनीची संबंधीताने दुसºयाला विक्री करून नफा मिळवायचा. त्यानंतर दुसºयाने ती तिसºयाला विकायची. या सर्व व्यवहारांमध्ये मात्र दलाल, तलाठी, सर्कल, तहसीलदार व माफिया अशी कॉमन साखळी असायची. एकरी १ लाखापासूनचा नफ्याचा व्यवहार १६ लाखांपर्यंत गेल्याचे समजते. सरासरी ४ ते ५ लाख रूपये एकरी दर धरला तरीही हा घोटाळा १०० कोटींच्या आसपास आहे. प्रत्यक्षात किंमत अधिक असल्याने हा शेकडो कोटींचा घोटाळा असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे शहर व तालुक्यातील काही बड्या राजकारण्यांसह सुमारे ५५ जणांचा यात समावेश असल्याची उघड चर्चा सुरू आहे. मात्र तरीही चौकशी समिती चाकोरीबद्धरितीनेच तपास करीत आहे. केवळ तलाठ्याची चौकशी करून त्यावरच कारवाई करून काहीही होणार नाही. चौकशी समितीने स्वत:हून या घोळाचे धागेदोरे शोधण्याची गरज आहे. महसूलच्या रेकॉर्डमधील नोंदींमध्ये बदल केलेले नसले तरीही बनावट सातबाराच्या आधारे खरेदी-विक्रीचे व्यवहार नोंदविले गेले आहेत. त्याची माहिती चौकशी समितीने दुय्यम निबंधक कार्यालयाकडून मागवून सर्वप्रथम वनजमिनीच्या सातबारा ज्यांच्या नावाने झाला, त्या सर्वांना नोटीस देऊन चौकशीसाठी बोलविण्याची व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. मात्र चौकशी समिती चाकोरीबद्धरितीने चौकशी करून काम टाळत असल्याची चर्चा आहे. आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी या खरेदी-विक्री व्यवहारांची माहिती मागविली आहे. त्यामुळे त्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला तरच या घोटाळ्यातील दोषी समोर येऊ शकतील.