पारोळा येथे पक्षाच्या संपर्क कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवक जोडो संपर्क अभियान व आढावा बैठकीत हा संदेश दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, कार्याध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य रोहन पाटील, नगरसेवक रोहन मोरे, जिल्हा सरचिटणीस मनोराज पाटील, डॉ. शांताराम पाटील, बाळू पाटील, युवक अध्यक्ष योगेश रोकडे, अंकुश भागवत, गणेश पाटील, आदीजण उपस्थित होते. यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना डॉ. सतीश पाटील म्हणाले की, संघटनेत प्रामाणिकपणे काम करा, संघटन करून मोठे व्हा म्हणजे पदे आपोआप मिळतील.
यांच्या झाल्यात नियुक्त्या
दीपक पुंडलिक पाटील (कार्याध्यक्ष), दादाभाऊ महादू पाटील (तालुका कार्याध्यक्ष), सनी कैलास निकम (तालुका उपाध्यक्ष), अक्षय दशरथ वाघ (उपाध्यक्ष), मुकेश विश्वास पाटील (उपाध्यक्ष), समाधान संतोष पाटील (उपाध्यक्ष), नितीन सुभाष पाटील (मंगरूळ शिरसमनी, जि. प. गटप्रमुख), सुनील मोहन माळी (गण प्रमुख- शिरसमनी), अक्षय निकम (देवगाव गण प्रमुख), भावेश पाटील, राजेंद्र पाटील, गोपाल माळी, आदींची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थितांचे आभार लोकेश पवार यांनी मानले.
छाया---पारोळा येथे नियुक्तिपत्र देताना डॉ. सतीश पाटील, रवींद्र पाटील, रोहन मोरे, रोहन पाटील, मनोराज पाटील, डॉ. शांताराम पाटील, बाळू पाटील २३/१४