शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांनी स्वीकारला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:15 IST

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी वंदना चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र ...

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी वंदना चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, चौधरी यांनी ग्रामीण नेते, आजी- माजी पदाधिकारी यांच्या मदतीने चांगली कार्यकारिणी देत जिल्ह्यात राष्ट्रवादी महिला संघटना मजबूत कशी होईल, यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पाटील यांनी केले.

वंदना चौधरी यांनी बुलढाणा जिल्हा येथे निरीक्षकपदी काम केलेले असून त्यांचा अनुभव पाहता त्या अधिक चांगले काम करतील. वंदना चौधरी यांना ग्रामीण भागाचा दौरा करत असताना आपले सहकार्य राहील, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.

दोन वर्षांपासून प्रदेश सचिव पदावर कार्यरत असून बुलढाणा जिल्ह्याच्या निरीक्षकपदी काम पाहिले आहे. त्या अनुभवातून जिल्हाध्यक्ष पदाला न्याय देता येईल. याकडे माझा कल राहणार असल्याचे वंदना चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, चौधरी यांनी शुक्रवारी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यामुळे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अशोक लाडवंजारी, अशोक पाटील, सलीम इनामदर, दिलीप माहेश्वरी, किरण राजपूत, शकीला तडवी, मंगला पाटील, अर्चना कदम आदी उपस्थित होते.