ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.1- सातबारा कोरा करा यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुवारी सकाळी 11़30 वाजता जामनेर रोडवरील नवशक्त आर्केडपासून मोर्चा काढण्यात आला़ मोर्चेक:यांच्या अग्रभागी ढोल-ताशांचे क तसेच गोंधळी सहभागी झाले तसेच त्यामागे पाच बैलगाडय़ांवर पदाधिकारी आरूढ होत़े शेतकरी कजर्माफी झालीच पाहिजे यासह राज्य शासनाच्या भोंगळ कारभाराविषयी घोषणा देत पदाधिकारी प्रांताधिकारी कार्यालयावर धडकल़े प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आल़े
मोर्चात युवक प्रदेशाध्यक्ष संजय कोते-पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अॅड़रवींद्र भैय्या पाटील, तालुकाध्यक्ष व जि़प़सदस्य रवींद्र पाटील, प्रदेश सदस्य विजय चौधरी, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, युवक जिल्हाध्यक्ष योगेश देसले, शहराध्यक्ष शेख पापा शेख कालू, रावेर तालुकाध्यक्ष सोपान पाटील, माजी सभापती राजेंद्र चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाल़े