जळगाव : मनपात स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी हालचाली गतिमान झाल्या असून राष्ट्रवादी व मनसे दोन्हीही खान्देश विकास आघाडीच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा न दिल्यास मनसेची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी खाविआला पाठिंबा देण्यास विरोध दर्शविला आहे. तर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आमदार डॉ.सतीश पाटील यांना दिले आहेत. डॉ.पाटील यांनी नगरसेवकांशी चर्चा करून यावर निर्णय घेणार असल्याचे 'लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले.
खाविआकडून काही पदे मागून पाठिंबा देण्याबाबत चर्चा होऊ शकते. मात्र जर नगरसेवकांचा खाविआ विरोध कायमच राहिला तर खाविआला मनसेच्या पर्यायाचा विचार करावा लागणार आहे. डॉ.सतीश पाटील नगरसेवकांशी चर्चा करून काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून आहे.
---------------
मनसेला हवे सभापतीपद
दरम्यान मनसेने खाविआशी संपर्क केला असला तरीही त्यांनी खाविआकडे सभापतीपदाची मागणी केली असल्याचे समजते.