राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चोपडातर्फे पेट्रोल, डिझेल आणि गॅस यांच्या दरवाढीविरोधात केंद्र शासनाच्या निषेध म्हणून गॅस एजन्सीसमोर पेट्रोल पंपानजीक निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, पंचायत समिती उपसभापती सूर्यकांत खैरनार, देवगाव उपसरपंच युवराज पाटील, युवक तालुका अध्यक्ष मनोज पाटील, सेवा दल तालुका अध्यक्ष डॉ. विजयसिंग पाटील, शहर युवक अध्यक्ष समाधान माळी, युवक सेवा दल अध्यक्ष सतीश पाटील, युवक प्रसिद्धिप्रमुख संदीप कोळी, युवक विभागप्रमुख विशाल कोळी, अल्पसंख्याक तालुका कार्यध्यक्ष नईम शेख, गणेश कोळी आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१५सीडीजे ३