शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
4
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
5
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
6
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
7
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
8
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
9
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
10
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
11
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
12
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
13
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
14
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
15
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
17
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
18
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
19
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
20
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

श्रीराम पाटील यांचा राष्टÑवादीला ‘राम राम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 11:24 IST

घुमजाव: आज उमेदवारीची घोषणा होती अपेक्षित

जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघातून राष्टÑवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची तयारी दाखविलेल्या उद्योजक श्रीराम पाटील यांनी उमेदवारी जाहीर करण्याच्या अगोदरच रिंगणातून माघार घेत राष्टÑवादी कॉँग्रेसला ‘राम राम’ केला आहे.रावेर लोकसभा मतदार संघातून निवडणूक कॉँग्रेसने लढवायची की राष्टÑवादीने याबाबत एकमत झाले नसताना सोमवारी एका नाट्यमय घटनेनंतर माजी खासदार ईश्वरलाल जैन हे कोणताही राजकीय वारसा नसलेले उद्योजक श्रीराम पाटील यांना दुपारी २ वाजेच्या सुमारास जैन हिल्सवरील हेलिपॅडवर घेऊन गेले. त्या ठिकाणी श्रीराम पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांच्याशी परिचय करून देत त्यांना उमेदवारी द्यावी असे सांगितले. निवडणूक लढविण्याची तयारीही श्रीराम पाटील यांनी दाखविल्यानंतर केवळ पक्षप्रमुख खासदार शरद पवार यांच्याकडून उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणे बाकी होते. याबाबत आज घोषणा अपेक्षित होती. उभय नेत्यांनी श्रीराम पाटील यांना कामाला लागा असे संकेत देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.अचानक काढता पायदरम्यान, मंगळवारी श्रीराम पाटील यांनी काही भेटी गाठी घेतल्याचे सांगण्यात आले मात्र दुपारनंतर त्यांनी राष्टÑवादीतील पदाधिकाऱ्यांना तसेच वरिष्ठ नेत्यांना आपण निवडणूक लढविण्यास तयार नसल्याचे कळवून धक्का दिला. ही वार्ता मुंबईपर्यंत पोहोचविण्यात आल्याचे राष्टÑवादी कॉँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.पुन्हा शोधाशोधरावेर लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी लढविणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. राज्यस्तरावरील २६-२२ च्या फॉर्मूल्यात कोणताही बदल शक्य नसल्याचे संकेत प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी दिले होते. त्यामुळे वाटेला असलेल्या रावेर लोकसभा मतदार संघासाठी पुन्हा उमेदवार शोधण्याची वेळ या पक्षावर आली आहे. पक्षाकडून उमेदवारीसाठी माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार निळकंठ फालक यांचे नाव चर्चेत आहे. आता यांच्यापैकी कुणाला संधी मिळते की नवीन चेहेरा शोधला जातो याबाबत आता उत्सुकता आहे.श्रीराम पाटील यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. कोरी पाटी असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न केले. त्यांनी अगोदर होकार दिला होता. मात्र आज त्यांनी नकार कळविला आहे. पर्यायांबाबत आता पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील.-ईश्वरलाल जैन, माजी खासदार.

टॅग्स :Politicsराजकारण