शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारचे ‘बाप्पा’ चालले आफ्रिका भेटीला!

By admin | Updated: August 1, 2014 15:12 IST

नंदनगरीच्या बाप्पांची महती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. यंदा जवळपास अडीचशे मूर्ती आफ्रिकेला रवाना होत असून, तेथेही ‘बाप्पाचा जयघोष’ होणार आहे.

अडीचशे मूर्ती जाणार : प्रथमच ‘ग्लोबल क्रेझ’मनोज शेलार, नंदुरबारनंदनगरीच्या बाप्पांची महती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. यंदा जवळपास अडीचशे मूर्ती आफ्रिकेला रवाना होत असून, तेथेही ‘बाप्पाचा जयघोष’ होणार आहे. त्यामुळे नंदुरबारच्या गणेशमूर्तीला ‘ग्लोबल क्रेझ’ मिळणार आहे.नंदुरबारमधील गणेशमूर्ती उद्योग राज्यात प्रसिद्ध आहे. येथील मूर्तींना गुजरात आणि मध्य प्रदेशातही मागणी आहे. १ इंचापासून ते २२ ते २५ फुटांपर्यंतच्या मूर्ती येथे तयार होतात. यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील तब्बल अडीचशे मूर्ती या दक्षिण आफ्रिकेत जाणार आहेत. त्यातील १०० मूर्ती पोहोचल्यादेखील आहेत. उर्वरित दीडशे मूर्ती पोहोचविण्यासाठी मूर्तिकार पंकज सोनार यांची लगबग सुरू आहे.मूळचे नंदुरबार येथील जयेश सोनार नोकरीनिमित्त दहा-बारा वर्षे आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे होते. मराठी आणि गुजराती कुटुंबांपर्यंत ही माहिती पोहोचल्यावर त्यांनीही गणेशोत्सव साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यानुसार एक, दोन नव्हेतर अडीचशे कुटुंबांनी मूर्तीची मागणी केली. जयेश सोनार यांनी नंदुरबारातील त्यांचे नातेवाईक तथा मूर्तिकार पंकज सोनार यांना ही बाब सांगितली. त्यांनी मूर्ती पुरविण्यास होकार दिला.एकाच आकारातील मूर्ती एकाच आकारातील एकसारख्या मूर्तीची मागणी करण्यात आली. सोनार यांनी दगडूशेठ हलवाई यांचा गणपती, लालबागचा राजा हे दोन पर्याय ठेवले. त्यात लालबागचा राजाला पसंती मिळाली. त्यानुसार त्या छबीच्या, सहा इंच उंचीच्या अडीचशे मूर्ती बनविण्यात आल्या. १०० मूर्ती सुरतमार्गे विमानाने पाठविण्यात आल्या. तीन डॉलरला मूर्तीआफ्रिकेतील मूर्तीची किंमत तीन डॉलर ठेवण्यात आली आहे. आफ्रिकेत उत्सव साजरे करण्यासाठी नियम व अटी असल्याने तेथे गणेशोत्सव साजरा केला जात नव्हता. परंतु महाराष्ट्रीयन आणि गुजराती कुटुंबांनी एकत्र येऊन सर्व अडचणींवर मात करत उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे.