शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पाळधीतील जुगार अड्ड्यावरील कारवाईत लोकप्रतिनीधींची नावे वगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:16 IST

जळगाव : पाळधी येथे रिंगणगाव रस्त्यावर सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर मंगळवारी रात्री परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी ...

जळगाव : पाळधी येथे रिंगणगाव रस्त्यावर सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर मंगळवारी रात्री परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी कारवाई केली. यात जळगाव मनपामधील माजी लोकप्रतिनिधींसह काही सरपंच व इतर जुगारी मिळून आले. गणापुरे यापैकी कुणालाही ओळखत नसल्याने कारवाईचे पुढील सूत्र स्थानिक पोलिसांकडे सोपवून निघून गेले. त्यानंतर पोलिसांनी मोठा झोल केल्याची चर्चा जोरात रंगत आहे.

पाळधी गावापासून काही अंतरावर रिंगणगाव रस्त्यावर एका शेतात हा जुगार अड्डा सुरू होता. एका गावातील सरपंच व जळगाव शहरातील काही बड्या व्यक्तींची यात भागीदारी असल्याची माहिती हाती आली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हे गाव आहे. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी हा जुगारअड्डा उधळून लावून धरणगाव पोलीस निरीक्षक व पाळधी दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक यांना चपराक दिली. त्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेले हे धंदे त्यांना माहीत नाही, असेही म्हणता येणार नाही. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचाही या गावात सतत वावर असताना त्यांनाही या धंद्यांची कल्पना नव्हती का, असाही सवाल विचारला जात आहे.

१५ लाखाच्यावर रोकडची चर्चा

गणापुरे यांनी उधळलेल्या या जुगार अड्ड्यावर १५ लाखाच्या वर रोकड आढळून आल्याची जोरदार चर्चा आहे, असे असताना पंचनाम्यात फक्त २ लाख ८६ हजार रुपये दाखविण्यात आले. गणापुरे निघून गेल्यानंतर बडे राजकारणी असलेल्या जुगाऱ्यांना स्थानिक पोलिसांनी पध्दतशीरपणे वगळले असून रात्री २ वाजेपर्यंत हा घोळ सुरु होता, अशीही माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. सुरुवातील जुगाऱ्यांची २२ संख्या सांगितली जात असताना प्रत्यक्षात कागदावर १९ जणांना घेण्यात आले आहे. पोलिसांच्या या आर्थिक झोलविषयी जोरदार चर्चा रंगू लागली आहे. अवैध धंद्यांना हिरवा सिग्नल मिळाल्याची देखील जिल्हाभरात चर्चा रंगू लागली असून परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या प‌थकाकडून होत असलेल्या कारवाईवरून सिध्द होत आहे.