शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाच्या दिवशीच उत्तरकार्याचा नेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST

चाळीसगाव : सुदैवाची जशी वेगवेगळे रूपे असतात. तसेच दुर्दैवाचे फेरेही काळजाचे ठाव घेतात. या फेऱ्यांमध्ये जे अडकतात, त्यांच्यावर आभाळच ...

चाळीसगाव : सुदैवाची जशी वेगवेगळे रूपे असतात. तसेच दुर्दैवाचे फेरेही काळजाचे ठाव घेतात. या फेऱ्यांमध्ये जे अडकतात, त्यांच्यावर आभाळच कोसळते. होत्याचे क्षणार्धात नव्हते होऊन जाते. चाळीसगाव येथील शिक्षक राजेंद्र सूर्यवंशी यांच्या मृत्यूने दुर्दैवाचे हेच रूप दाखविले आहे. दि. १ जून रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांचे उत्तरकार्य पार पडले. या दुर्दैवी योगामुळे अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

टाकळी प्र.चा. भागातील शिवशक्तीनगरातील रहिवासी राजेंद्र चंद्रसिंग सूर्यवंशी (४३) हे राष्ट्रीय सह. शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना भटकंतीची विशेष आवड असल्याने ते ओघवत्या शब्दात विद्यार्थ्यांना प्रवास वर्णने ऐकवत. विद्यार्थीप्रिय शिक्षक असा ठसा त्यांनी उमटवला होता. वयाच्या ४३ वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. घरातील कर्तापुरुष त्यांच्या रूपाने हरविला आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, आई-वडील, टाकळी प्र.दे. येथे शिक्षिका असणाऱ्या पत्नी सुरेखा सूर्यवंशी असा परिवार आहे.

........

चौकट

कोरोनापूर्वीची भ्रमंती ठरली शेवटची

सूर्यवंशी यांना भटकंतीची विशेष आवड होती. ऐतिहासिक स्थळांसोबतच ते पर्यटनस्थळीही आवर्जून जात. कोरोनाची लाट येण्यापूर्वीच ते प्रसन्न खंडाळे, जगन्नाथ निकम व खलाणे या शिक्षक मित्रांसमवेत राजस्थान परिसरात फिरावयास गेले होते. ही त्यांची अखेरची भ्रमंती ठरली. ते इंग्रजी विषयाचे माध्यमिक शिक्षक होते. त्यांचे वडील हेही सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत.

.........

चौकट

वाढदिवसाच्या दिवशी फोटोला पुष्पहार

राजेंद्र चंद्रसिंग सूर्यवंशी यांना २८ मे रोजी अवस्थ वाटू लागले. ते दवाखान्यातही गेले. दुपारी १२ वाजता जेवण करून ते झोपले. ही झोपच त्यांच्यासाठी काळझोप ठरली. त्यांना झोपेतच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने चिरशांत केले. पाचव्या दिवशी म्हणजेच १ जून रोजी त्यांचे उत्तरकार्य पार पडले. १ जून रोजी त्यांचा वाढदिवसही असायचा. वाढदिवसाच्या दिवशीच त्यांच्या फोटोला घातलेला पुष्पहार आणि समोर जळणारी अगरबत्ती पाहून अनेकांना हुंदका दाटून आला.

===Photopath===

010621\01jal_18_01062021_12.jpg

===Caption===

राजेंद्र सूर्यवंशी