शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नामस्मरणाने जीवनात मिळतो आनंद आणि सुख ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:12 IST

ऐहिक आणि परमार्थ अशा दोन्ही विषयांची आवड असलेल्या व्यक्तीसाठी नामजप लाभदायक असतो. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘तुझा सगळा परमार्थ ...

ऐहिक आणि परमार्थ अशा दोन्ही विषयांची आवड असलेल्या व्यक्तीसाठी नामजप लाभदायक असतो. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘तुझा सगळा परमार्थ जर देहासाठी असेल. देह सुखी असावा, देहाला रोग नसावा, इत्यादींसाठी असेल, तर ते आपली स्वतःची कामधेनू देऊन गाढव विकत घेण्यासारखे आहे. ऐहिक सुख इच्छिणार्‍यांना सकाम साधनेने सुख मिळते, तसेच त्यांचे दुःख न्यून होते. तर पारमार्थिक आनंद इच्छिणार्‍यांना निष्काम साधनेने आनंदावस्था अनुभवता येते, तसेच त्यांच्या ऐहिक दुःखातही घट होते. अध्यात्म हा केवळ बौद्धिक स्तरावर समजून घेण्याचा विषय नाही, तर प्रत्यक्षात स्वतः कृती केल्यावर त्याची अनुभव अर्थात अनुभूती घेण्याचा विषय आहे.

चौकट :

आनंद कशाला म्हणावे ?

पंचज्ञानेंद्रिये, मन व बुद्धी याद्वारे जे अनुभवतो ते सुख असते, ते क्षणिक असते. उदाहरण द्यायचे झाल्‍यास, मनपसंत पक्‍वान्‍न खाणे हे जीभेने अनुभवतो; पण तो पदार्थ आपण ठराविक प्रमाणातच खाऊ शकतो, पर्यटनस्‍थळी जाऊन डोळ्‍यांनी निसर्ग सौंदर्य पहातो; पण हे आपण २४ घंटे करू शकत नाही. एखादे कोडे सोडविल्‍यावर आपल्‍याला आनंद मिळतो; पण तो किती काळ टिकतो?; कारण ते बुद्धीचे सुख असते. चांगले गाणे ऐकल्‍यावर मनाला आनंद मिळतो; पण ते गाणे १०-२० वेळा ऐकल्‍यावर आपल्‍याला तेवढाच आनंद मिळतो का?, तर ‘नाही’ ! याचे कारण ते क्षणिक असते. पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी याद्वारे जे सुख अनुभवतो ते क्षणिक असते; कारण त्‍याला मर्यादा आहेत.

पंचज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्‍या पलीकडे जे अनुभवतो त्‍याला आनंद म्‍हणतात. कारण तो आत्‍म्‍याकडून मिळतो. आत्‍म्‍यालाच आपण ईश्‍वर म्‍हणतो. आत्‍म्‍याकडून मिळणारे सुख २४ घंटे मिळणारे असतो. ते चिरंतन टिकणारे असते. ते कधी न संपणारे असते. तो आनंद अमर्याद असतो, ज्‍याच्‍या आपण शोधात असतो. त्‍यासाठी साधना करायची असते.

निरुपण : सद्गुरु नंदकुमार जाधव.