जळगाव : शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात नुकतीच एन. मुक्टो संघटनेची सभा पार पडली. यावेळी बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन आढावा घेण्यात आला.
याप्रसंगी प्रा.डॉ. जितेंद्र तलवारे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक एम.फुक्टो सहसचिव डॉ.संजय सोनवणे यांनी नेट सेट संदर्भात त्यांनी सद्य:स्थिती सादर केली. तर एन.मुक्टो अध्यक्ष प्रा.डॉ.अनिल पाटील यांनी प्राध्यापकांना विविध वेतन आयोग मिळाले. याचे संपूर्ण श्रेय संघटनेला द्यावे लागेल. ७१ दिवसांचे थकीत वेतन संघटनेच्या लढ्यामुळे मिळाले, अशी माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी पीएच.डी.च्या प्रोत्साहनपर वेतनवाढीच्या संदर्भात व एम.फील अर्हताधारक प्राध्यापकांचे नियुक्ती व प्रमोशन यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी सभेत ई.जी. नेहते, नितीन बाविस्कर, प्रा.डॉ. दिनेश पाटील, प्रा. डॉ. राजू केंद्रे, प्रा. डॉ. खासेराव पाटील, प्रा. प्रेमराज पाटील, प्रा. डॉ.महेंद्र सोनवणे, प्रा. दिनेश पाटील, मनोहर पाटील, मनोज गायकवाड, प्रा.डॉ. के.जी. कोल्हे, प्रा. नितीन बाविस्कर, प्रा. डॉ. दिनेश पाटील, प्रा. डॉ. अजय पाटील, प्रा. डॉ. सचिन नांद्रे, प्रा. डॉ. संजय गरुड, प्रा. डॉ.रवींद्र वाघ आदींची उपस्थिती होती.