शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

शेंदुर्णी येथील कोरोनाबाधित महिलेस तीनच दिवसात दिला परस्पर डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 21:37 IST

जीवघेणा खेळ : जळगाव येथील कोविड रुग्णालयाचा अजब कारभार उघड

पहूर, ता. जामनेर : शेंदुर्णीतील ५४ वर्षीय बाधित महिलेच्या चाचणी अहवालाला तीन दिवसही उलटले नसताना जळगाव कोविड रुग्णालयातून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अवघ्या तीन दिवसांच्या आत महिलेचा डिस्चार्ज परस्पर केल्याची धक्कादायक बाब पहूर येथे उघडकीस आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या एक तासाच्या गोंधळानंतर जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार संबंधित महिलेला पळासखेडे, ता. जामनेर रुग्णालयात पुन्हा भरती करण्यात आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचा जीवघेणा खेळ चव्हाट्यावर आला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार शेंदुर्णीतील महिला पहूर ग्रामीण रुग्णालयात २९ रोजी दाखल झाली. संबंधित वैद्यकीय अधिकाºयांनी या महिलेला संशयित रुग्ण म्हणून जळगाव कोविड रुग्णालयात रवाना केले. याठिकाणी या महिलेला भरती करून स्वॅब घेतला. या चाचणीचा अहवाल १ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नियमानुसार चौदा दिवस रुग्णालयात महिलेला ठेवणे आवश्यक आहे. पण झाले उलटेच महिलेची तीन दिवसांच्या आत परस्पर सुटी झालीे.आरोग्य यंत्रणेचाभोंगळ कारभारबाधित महिलेच्या अहवालाला तीन दिवस पूर्ण होत नाही, तोच संबंधित वैद्यकीय अधिकाºयांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना कल्पना न देता ३ रोजी महिलेच्या मुलाला बोलावून परस्पर डिस्चार्ज केला. जळगाव कोविड रुग्णालयाने बाधित आई व मुलगा यांना खासगी रुग्णवाहिकेने सोडण्याची व्यवस्था केली. तर बाधित महिलेच्या संपर्कातील दहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आहे. मुलगा पहूर सेंटरवर क्वारंटाईन झाला असून त्याचा स्वॅब घेण्यात आला आहे.रुग्णवाहिका चालकाचापळ काढण्याचा प्रयत्नमहिलेला रस्त्यात सोडत असल्याचे पाहून पहूरचे वैद्यकीय अधिकारी चौकशी करीत असताना जळगावहून आलेल्या रुग्णवाहिका चालकाने त्यांना अरेरावीची भाषा वापरून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाºयांनी त्याला थांबविले. याठिकाणी उपस्थित पेठचे उपसरपंच श्यामराव सावळे, सामाजिक कार्यकर्ते मुन्ना पठाण यांच्यासह वीस ते पंचवीस नागरिक पदाधिकाºयांनी चालकाला समजविले. तरीही चालक ऐकत नव्हता. त्यामुळे पदाधिकाºयांनी पोलिसांची धमकी भरल्यानंतर चालक शांत झाला. एक तास आरोग्य यंत्रणेचा फोनाफोनीचा गोंधळ सुरू होता. संबंधित वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांनी वरिष्ठांशी चर्चा केली. अखेर जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार संबंधित महिलेला त्याच रुग्णवाहिकेतून पळासखेडा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अशा भोंगळ कारभाराबाबत नवनियुक्त जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे.रुग्णवाहिका चालकाने रस्त्यातच सोडलेमहिलेचा डिस्चार्ज झाल्याने शेंदुर्णी येथे नातेवाइकांना फोन करुन येत असल्याचे सांगितले. मात्र तीन दिवसांत सुट्टी झाली कशी? या संशयाने शेंदुर्णीत येण्यास संबंधित महिलेच्या नातेवाइकांनी विरोध दर्शविला. त्यामुळे ३ रोजी जळगाव कोविड रुग्णालयातून निघालेली रुग्णवाहिका दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास पहूर ग्रामीण रुग्णालयाच्या काही अंतरावर पाचोरा रस्त्यावर पोहचल्यावर तेथेच सदर महिला व मुलाला सोडून संशयास्पदरित्या निघाली होती. यादरम्यान पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी क्वारंटाईन सेंटरवरून येत असताना हा प्रकार निदर्शनास आला.संबंधीत वैद्यकीय अधिकाºयांनी बाधित महिलेला व रुग्णवाहिकेच्या चालकाला विचारणा केली. तर बाधित महिलेने अधिकाºयांना डिस्चार्ज कार्ड दाखविले आणि येथेच बिंग फुटले.