शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्यासह ६ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 23:07 IST

कलम वाढवले; पत्नीला जिवंत जाळल्याची तक्रार

जळगाव : आशाबाबा नगरातील श्यामराव नगरात राहणाऱ्या सोनाली नरेंद्र सोनवणे या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणात पती पोलीस कर्मचारी पती नरेंद्र सोनवणे, सासू प्रमिलाबाई, सासरे भगवान कौतिक सोनवणे, दीर योगेश, दीरानी स्वाती योगेश सोनवणे (सर्व रा.आशाबाबा नगर) व नणंद सरला देशमुख (रा.परभणी) यांच्याविरुध्द गुरुवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याआधी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होता.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलै रोजी पहाटे २.३० वाजता सोनाली जळालीचा निरोप नातेवाईकांना देण्यात आला होता. लगेच सकाळी ७ वाजता तिचा मृत्यू झाला होता. सोनाली हिने बाथरुममध्ये जाळून घेतल्याने सासरच्या लोकांचे म्हणणे होते. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सोनालीचा पती पोलीस असल्याने त्याने सर्व पुरावे नष्ट केले असून तिला जाळून मारण्यात आल्याचा आरोप भाऊ गोविंदा चांभार यांनी केला होता. दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ने देखील गुरुवारच्या अंकात वृत्त प्रकाशित करुन याकडे लक्ष वेधले होते. दिवसभर चौकशी करुन दोन साक्षीदारांच्या जबाबावरुन पती नरेंद्रसह सहा जणांविरुद्ध खून व हुंडाबळीचे (कलम ३०२ व ३०४ ब) कलम वाढविण्यात आले. याप्रकरणात अद्याप एकालाही अटक झालेली नाही. दरम्यान, या गुन्ह्याचा तपासही पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.