शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मनपा स्थायीची आज सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:21 IST

जळगाव - मनपा स्थायी समितीच्या सभेचे आयोजन बुधवारी सकाळी ११ वाजता सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या दुसऱ्या ...

जळगाव - मनपा स्थायी समितीच्या सभेचे आयोजन बुधवारी सकाळी ११ वाजता सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात करण्यात आले आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून स्थायी समितीची सभा सभागृहात झालेली नव्हती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ९ महिन्यानंतर मनपाच्या सभागृहात स्थायीची सभा होणार आहे. सभेत एकूण ९ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.

बळीराम पेठ भागात कारवाई

जळगाव - शहरातील बळीराम पेठ, सुभाष चौक, दाणा बाजार भागात मंगळवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून जोरदार कारवाई करण्यात आली. यामध्ये काही हॉकर्सकडून माल जप्त करण्यात आला. यासह उपायुक्त संतोष वाहुळे यांनी भजेगल्ली भागात जाऊन पाहणी केली. याठिकाणी तीन विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती. त्यांच्यावरही मनपाकडून कारवाई करण्यात आली.

पारा ९ अंशावर घसरला

जळगाव - जिल्ह्यात आता थंडीचा कहर अधिक वाढला आहे. मंगळवारी शहराचा किमान पारा ९ अंशापर्यंत खाली घसरला होता. या हंगामात दुसऱ्यांदाच पारा ९ अंशापर्यंत खाली घसरला आहे. थंडीचा कडाका वाढल्यामुळे जनजीवनावर देखील त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे. यासह कमाल तापमान देखील २७ अंशापर्यंत खाली आल्यामुळे दिवसासह गारवा जाणवत आहे. अजून चार दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सुरत रेल्वेगेटवर पुन्हा वाहतूक कोंडी

जळगाव - शहरातील सुरत रेल्वेगेट जवळ वाहतूक कोंडीची समस्या आता वाढतच जात आहे. मंगळवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास याठिकाणी अवजड वाहनांनी रस्ता अडविल्याने सुमारे अर्धातास वाहतूककोंडी झाली होती. यामुळे याठिकाणी काही वाहनधारकांमध्ये वाद देखील झाले. याठिकाणी वाहतूक शाखेचा कोणताही कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.