शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका अतिक्रमण विभागाने केली ७२ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर मार्च २०२० पासून मुख्य बाजारपेठांवर बंधने घालण्यात आली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर मार्च २०२० पासून मुख्य बाजारपेठांवर बंधने घालण्यात आली होती. तसेच नियमांचे काटेकोर पालन न करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश प्रशासनाकडून काढण्यात आले होते. मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत एकूण ७२ लाखांची वसुली केली आहे. एकीकडे या काळात इतर मालमत्तांची वसुली थांबली असताना, दुसरीकडे अतिक्रमण विभागाने या काळात ७२ लाखांची वसुली करून, मनपाच्या उत्पन्नात वाढ केली आहे.

कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी व शासनाने दिलेले नियम पाळले गेले पाहिजे यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गेल्या दोन वर्षांत मोठी कामगिरी बजावली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या विभागाला ५० कर्मचाऱ्यांची गरज आहे अशा विभागातील केवळ १५ जणांनी ही इतकी मोठी कामगिरी बजावली आहे. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत ३६ लाख २२ हजार ५८५ रुपयांची वसुली मनपाच्या अतिक्रमण विभागाने केली तर एप्रिल २०२१ ते जुलै २०२१ या केवळ ४ महिन्याच्या कालावधीत याच विभागाने ३६ लाख २३ हजार ७४५ रुपये इतकी दंडात्मक कारवाई केली आहे.

एकाही कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण नाही

महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गेल्या वर्षभरापासून एकही रजा न घेता एकही दिवस कामावरची टाळाटाळ न करता ही इतकी वसुली केली आहे. अशी माहिती महानगरपालिका अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली. याचबरोबर ते असेही म्हणाले की सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे अनेक कोरोना काळात नागरिकांमध्ये जाऊन काम करत असताना देखील अतिक्रमण विभागातील एकाही कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झालेली नाही.

४०० हून अधिक दुकाने केली सील

महापालिकेने लॉकडाऊनच्या काळात नियमांचे पालन न करणाऱ्या ४०० हून अधिक दुकानदारांवर कारवाई केली आहे. या कारवाईमधून सुमारे ४२ लाखांची वसुली महापालिकेने केली आहे. यासह रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांसह मंगल कार्यालय, हॉटेल व्यवसायांवर कारवाई करून, सुमारे २० लाखांची वसुली मनपाकडून करण्यात आली आहे.