शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पालिका कर्मचा:यांचे आंदोलन अखेर मागे

By admin | Updated: April 25, 2017 00:30 IST

आठव्या दिवशी : ‘काम बंद’ चा फियास्को, चर्चेतून घडून आली तडजोड

चाळीसगाव : सेवानिवृत्त पालिका कर्मचारी आणि प्रशासन यांच्यात तडजोड होऊन  24 रोजी दुपारी अडीच वाजता आमदार उन्मेष पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, गटनेते राजेंद्र चौधरी,  मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांचे हस्ते उपोषणाची सांगता झाली.17 तारखेपासून पलिकेचे निवृत्त कर्मचारी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. 88 लाख 36 हजार 518 रु.इतकी रक्कम कर्मचा:यांना विविध देणीतून द्यावीत ही त्यांची प्रमुख मागणी  होती.  ती मागणी मान्य करत त्यापोटी 59 लाख 45 हजार 645 रु. आजच अदा केले जातील व उर्वरित रक्कम  28 लाख 90 हजार 873 रु. येत्या काही दिवसात  दिले जातील तसेच शासनाकडून येणारे गौण खनिज, मुद्रांक शुल्क व करमणुक कराचे येणारे अनुदानही सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचा:यांना रािहलेल्या थकीत  रकमेपोटी अदा करण्यात येईल असे लेखीपत्र मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डी.एस.मराठे यांना दिले. त्याचे वाचन झाले व त्यावर चर्चा होऊन अखेर उपोषण मागे घेण्याचा निर्णय झाला.मनोगतात राजेंद्र चौधरी यांनी सांगितले की कर्मचा:यांची मागणी रास्त आहे. विरोधक असतानाही या कर्मचा:यांच्या पाठीमागे होतो. आणि आताही आम्ही सर्व जण त्यांच्या पाठीमागे आहोत. कामगार युनियनचे सरचिटणीस देविदास बोंदार्डे यांनी सांगितले की, उशीरा का होईना पदाधिका:यांनी कर्मचा:यांची मागणी मान्य करीत सोडवली आहे. यावेळी नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, सुशील वानखेडे, शेख चिरागउद्दीन, भास्कर पुंडलिक पाटील, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान आंदोलनकत्र्याना साथ म्हणून सोमवारी कार्यरत कर्मचा:यांनी कामबंद आंदोलनाचा इशार दिला होता.  मात्र नगरपालिका  कर्मचा:यांमध्ये फूट पडल्याने 24 रोजी काम बंद आंदोलनाचा फियास्को झाला. सोमवारी नगरपालिकेत  कायम, हंगामी, रोजंदारी कामगारांनी 100 टक्के  हजेरी लावून कामकाज केले. दुसरीकडे मात्र सेवानिवृत्त कर्मचा:यांचे आठव्या दिवशीही तहसील कार्यालयासमोर दुपार्पयत आमरण उपोषण सुरू होते.  चर्चेनंतर ते मागे घेण्यात आले.सोमवारी पहाटे सफाई कामगारांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतला होता परंतु  ही बाब कळताच पालिका पदाधिका:यांनी या सफाई कामगारांची भेट घेतली आणि काही वेळेनंतर कामगारांनी पूर्ववत कामकाजात सहभाग नोंदवला. सकाळी 10 वाजता  नगरपालिका कार्यालयात सर्वच अधिकारी व कर्मचा:यांनी हजेरी लावून कामात सहभाग घेतला. कर्मचा:याला आली चक्कर24 रोजी सकाळी उपोषणस्थळी अशोक किसन गोसावी या कर्मचा:याला चक्क़र आल्याने तो खाली पडला. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.पी. बाविस्कर यांनी   त्याची तपासणी केली.  (वार्ताहर)