शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईच्या पालखी सोहळ्यात रेडा झाला नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 19:51 IST

पंढरीच्या वाटेवर असलेल्या मुक्ताई पालखी सोहळ्याची झपाझप पाऊले पुढे सरकत असताना मोरगाव (जि.उस्मानाबाद) जवळून जात असताना परिसरातील शेतात काही गुरे चरत होती, तर पालखी सोहळा टाळ मृदुंग व मुक्ताईच्या नामघोषात तल्लीन होत पुढे सरकत होता. अचानक या गुरांमधील एक भारदस्त रेडा पालखीला नतमस्तक होत होता हे दृश्य पालखी सोहळ्यातील हजारो वारकरी व परिसरातील शेतकऱ्यांनी पाहिले.

ठळक मुद्देरेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला ।हाच प्रत्यय मुक्ताईच्या पालखी सोहळ्यात रेडा नतमस्तक झालाउस्मानाबाद जिल्ह्यातील मोरगाव जवळील घटनागेल्या वर्षी शेगाव पालखी सोहळ्यात पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी चक्क हरण सामील झाले होते

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : पंढरीच्या वाटेवर असलेल्या मुक्ताई पालखी सोहळ्याची झपाझप पाऊले पुढे सरकत असताना मोरगाव (जि.उस्मानाबाद) जवळून जात असताना परिसरातील शेतात काही गुरे चरत होती, तर पालखी सोहळा टाळ मृदुंग व मुक्ताईच्या नामघोषात तल्लीन होत पुढे सरकत होता. अचानक या गुरांमधील एक भारदस्त रेडा पालखीला नतमस्तक होत होता हे दृश्य पालखी सोहळ्यातील हजारो वारकरी व परिसरातील शेतकऱ्यांनी पाहिले. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला ।हाच प्रत्यय मुक्ताईच्या पालखी सोहळ्यात रेडा नतमस्तक झाल्याने मिळाला.आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनाची तीव्र ओढ व ऊन-पावसाची तमा न बाळगता ८ जून रोजी श्री संत मुक्ताई पालखी सोहळा हजारो वारकरी व भाविकांसह गेल्या २९ दिवसांपासून अखंड पायी चालत आहे.तिसाव्या दिवसाचा मुक्काम उस्मानाबाद जिल्ह्यातील आष्टा या गावी होता. गावाच्या दिशेने निघालेली पालखी मोरगाव जवळून जात असताना परिसरातील शेतात काही गुरे चरत होती, तर पालखी सोहळा टाळ मृदुंग व मुक्ताईच्या नामघोषात तल्लीन होत पुढे सरकत होता. अचानक या गुरांमधील एक भारदस्त रेडा पालखीला नतमस्तक होत होता. हे दृश्य पालखी सोहळ्यातील हजारो वारकरी व परिसरातील शेतकऱ्यांनी पाहिले. पालखी सोहळा प्रमुख हभप रवींद्र हरणे महाराज यांनी लागलीच या रेड्याला पालखी जवळ आणण्यास सांगितले. त्यानुसार एका शेतकºयाने रेड्याला रस्त्यावर आणत पालखी सोहळ्यातील आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन दिले, तर रेड्यानेही पालखीसमोर साष्टांंग दंडवत घातले. या घटनेचा प्रत्यक्ष व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.गेल्या वर्षी शेगाव पालखी सोहळ्यात पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी चक्क हरण सामील झाले होते. याची प्रचिती रेड्याने करून दिल्याने भक्तीचा लळा माणसालाच नाही तर प्राण्यांमध्येही दिसून येत आहे, तर संत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदविला होता. याची प्रचिती मोरगाव जवळ हजारो वारकºयांनी अनुभवली तर हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यातून अश्रूदेखील तरळले.याप्रसंगी पालखी सोहळा प्रमुख हभप रवींद्र हरणे महाराज, हभप नितीनदास महाराज, सदाशिव पाटील, ज्ञानेश्वर हरणे, अजय तळेले यांनी रेड्याला पुष्पहार घालून शाल व श्रीफळ देत सन्मान केला . 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर