शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

मुक्ताईनगरात अंकूर मराठी साहित्य संमेलन ६ व ७ जून रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 18:45 IST

मुक्ताईनगर येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनतर्फे आयोजित ५७वे अखिल भारतीय अंकूर मराठी साहित्य संमेलन येत्या ६ व ७ जून रोजी आदिशक्ती संत मुक्ताईच्या पावनभूमीत गोदावरी मंगल कार्यालयात आयोजित केले आहे.

ठळक मुद्देदोन दिवसीय साहित्य संमेलनात विविध कार्यक्रमबहारदार लावणीचा कार्यक्रमही रंगणारविविध पुरस्कारांचेहे वितरण

मुक्ताईनगर, जि.जळगाव : येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनतर्फे आयोजित ५७वे अखिल भारतीय अंकूर मराठी साहित्य संमेलन येत्या ६ व ७ जून रोजी आदिशक्ती संत मुक्ताईच्या पावनभूमीत गोदावरी मंगल कार्यालयात आयोजित केले आहे. या संमेलनात विविध कार्यक्रम होणार आहेत.साहित्यिक प्राचार्य डॉ.किसन पाटील अध्यक्षस्थानी असतील. माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे उद्घाटन करतील.स्वागताध्यक्ष खासदार रक्षा खडसे असतील. विशेष अतिथी म्हणून हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद दहिवले, डॉ.विकास बाबा आमटे आनंदवन, भारताच्या पहिल्या महिला कुस्तीपटू सुवर्णकन्या अंजली वललाकटटी, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ता डॉ.शिवानंद भानुसे, जय मल्हार सेनेचे लहू शेवाळे, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत भाऊ पाटील आदी उपस्थिती राहणार आहे.संमेलनाच्या पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी, उद्घाटन, सोहळा, परिसंवाद, सीमरन पवार, पुणे यांचा बहारदार लावणीचा कार्यक्रम, प्रा.ज्ञानेश वाकुडकर, नागपूर यांचा बहारदार काव्यगीतांचा कार्यक्रम, कळमनुरी, जि.नांदेड येथील हास्यसम्राट शिलवंत वाढवे यांचा हास्य रंगारंग कार्यक्रम, याच दिवशी अंकुर वाङ्मय पुरस्कारसुद्धा प्रदान करण्यात येणार आहे. रात्री कविसंमेलनाचे आयोजन तर दुसऱ्या दिवशी मराठी गझल मुशायरा, कथाकथन, परिसंवाद, सुप्रसिद्ध गीतकार प्रा.जगदीश वेदपाठक यांचा मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम, गीतकार माया धुप्पड यांच्या जात्यावरच्या ओव्या आणि सुप्रसिद्ध गीतकार प्रवीण दवणे यांच्या व्याख्यानाने समारोप, संध्याकाळी राहिलेल्या कवींचे कविसंमेलन त्याच दिवशी शिवचरण उजजैनकर फाऊंडेशनचे जाहीर झालेले साहित्य पुरस्कार वितरणसुद्धा होणार आहे, असे संमेलनाचे मुख्य आयोजक तथा शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एस.एम.उज्जैनकर यांनी केले आहे.

टॅग्स :literatureसाहित्यMuktainagarमुक्ताईनगर