शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तालुका तीन दिवस ठेवणार पूर्णपणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 21:48 IST

मुक्ताईनगर : तालुक्यातील मन्यारखेडा येथे कोरोना बाधित महिला येऊन गेल्याने खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने रविवारी संपर्कात आलेल्या १४ जणांना ...

मुक्ताईनगर : तालुक्यातील मन्यारखेडा येथे कोरोना बाधित महिला येऊन गेल्याने खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने रविवारी संपर्कात आलेल्या १४ जणांना जळगाव येथे तपासणीसाठी पाठवले असताना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुक्ताईनगर तहसील कार्यालयाच्या सभागृहांमध्ये प्रशासनाची तातडीची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी तीन दिवस संपूर्ण तालुका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.या प्रसंगी पोलिस उपविभागीय अधिकारी सुरेश जाधव, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे ,तहसीलदार श्याम वाडकर, गट विकास अधिकारी सुभाष मावळे, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी निलेश पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. योगेश राणे, जि. प. चे माजी गटनेते विनोद तराळ, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अ‍ॅड. मनोहर खैरनार, प्रवीण चौधरी हे उपस्थित होते.या निर्णयानुसार दुचाकी वाहनांना देखील रस्त्यावर येण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. दवाखाने आणि मेडिकल वगळता किराणा, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.क्वारंटाईन व्यक्तीफिरताना आढळलीमुक्ताईनगर होमक्वारंटाईन केलेला व्यक्ती शहरातील प्रवर्तन चौकात सोमवारी आढळून आल्याने अचानक खळबळ उडाली. पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश जाधव,पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी सदर व्यक्तीची चांगलीच कानउघाडणी केली आणि घराकडे रवाना केले.कोविड कक्षाला आमदार पुरवणार भोजनउपाययोजना म्हणून मुक्ताईनगर शहरातील आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहाच्या इमारती ताब्यात घेऊन त्या ठिकाणी प्रत्येकी ४० असे ८० बेडचे कोविड कक्ष निर्माण करण्यात आले आहे. तर तिसरा कक्ष निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी महाविद्यालयाच्या वास्तूचा देखील विचार प्रशासन करत असून तालुक्यात एकूण दीडशे बेड स्वतंत्ररित्या निर्माण करण्यात येणार आहे. या सर्व बेडसाठी बेडशीट व उशा तसेच संध्याकाळचे जेवण हे आमदार चंद्रकांत पाटील हे स्वखचार्तून पुरवण्यात येणार आहे.