शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगरात संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळा २१पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 15:02 IST

श्री संत मुक्ताबाईंच्या सातशे तेविसाव्या तिरोभूत अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून विविध संतांचे पालखी सोहळे, वारकरी दिंड्या मुक्ताईनगरात दाखल होणार आहे.

ठळक मुद्देसंत निवृत्तीनाथ संत नामदेव श्री पांडुरंग पादुका पालखी येणारदररोज ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, भजन, प्रवचन, मान्यवरांची कीर्तनेकार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध देवस्थानप्रमुख, विश्वस्त व मुक्ताबाई फडावरील वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणारश्री पांडुरंगाच्या पादुका पालखीचे जळगाव जिल्ह्यातही कार्यक्रम

मुक्ताईनगर, जि.जळगाव : श्री संत मुक्ताबाईंच्या सातशे तेविसाव्या तिरोभूत अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून विविध संतांचे पालखी सोहळे, वारकरी दिंड्या मुक्ताईनगरात दाखल होणार असून, वैष्णवाचा मेळा जमणार आहे.७२३ वर्षांपूर्वी वैशाख वद्य दशमी श्री संत मुक्ताबाईंनी विजेच्या प्रचंड कडकडाटात तिरोभूत समाधी घेतली होती. त्यावेळी प्रत्यक्षात पांडुरंग परमात्मा, संत नामदेव संत निवृत्तीनाथ महाराज आदी संत मंडळी हजर होती.श्री संत मुक्ताई संस्थान श्रीक्षेत्र कोथळी (मुक्ताईनगर) समाधीस्थळ येथे परंपरेने समाधी सोहळा साजरा होत असतो. वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज मानकर यांनी घालून दिलेल्या परंपरेने २१ मेपासून दररोज ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, भजन, प्रवचन, हरिपाठ, मान्यवरांची कीर्तने इ. भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्त्व हभप संदीपान महाराज मोतेकर हे करतील. कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध देवस्थानप्रमुख, विश्वस्त व मुक्ताबाई फडावरील वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. २९ रोजी पहाटे समाधी सर्व सहभागी पादुकांना महापूजा, अभिषेक अ‍ॅड.रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात येईल. सकाळी साडेदहा ते साडेबारा संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे विद्यमान वंशज हरिभक्त पारायण गुरुवर्य केशवदास नामदास महाराज यांचे समाधी सोहळा गुलालाचे कीर्तन होईल. रात्री संत निवृत्तीनाथ संस्थान अध्यक्ष हभप पंडित महाराज कोल्हे यांचे मानाचे कीर्तन होईल.या कार्यक्रमासाठी राज्यभरातून वारकरी दिंड्यांसमवेत भाविक येत असतात. पंढरपूर येथून पांडुरंगाचा व संत नामदेव पालखी सोहळा व त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ पादुका पालखी सोहळा २७ रोजी मुक्ताईनगरकडे प्रस्थान करणार आहे. सर्व पालखी सोहळे २९ रोजी मुक्ताईनगर समाधी सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. भाविकांना संतांच्या दर्शनाचा लाभ यानिमित्ताने घडणार आहे.श्री पांडुरंगाच्या पादुका पालखीचे जिल्ह्यातील कार्यक्रमश्री पांडुरंग व संत नामदेव महाराज पालखी भेट सोहळा २८ रोजी दुपारी १२ वाजता जामनेर येथील सावता विठ्ठल मंदिरात होईल. सायंकाळी पाच वाजता भुसावळ येथे नाहटा कॉलेजजवळ संत निवृत्तीनाथ महाराज व श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळा भेट होईल. नंतर मिरवणुकीने विठ्ठल मंदिर वॉर्ड येथे मुक्कामी राहील. येथे भुसावळच्या भाविकांना दर्शन घेता येईल.२९ रोजी सकाळी वरणगाव येथे विसावा घेऊन सोहळा कोथळी येथे दाखल होईल.जास्तीत जास्त भाविकांनी जामनेर, भुसावळ, वरणगाव येथे दर्शनाचा लाभ घ्यावा व मुक्ताबाई समाधीस्थळ कोथळी येथील सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील व हभप रवींद्र महाराज हरणे यांनी केले आहे, असे व्यवस्थापक उध्दव महाराज जुनारे कळविले आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर