शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती डी. ओ. पाटील यांची गळा चिरून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 10:50 IST

मुक्ताईनगर पंचायत समितीच्या माजी सभापतींची हत्या करण्यात आल्याचे आज सकाळी उघडकीस आले.

ठळक मुद्देकुऱ्हा येथील घटनाघटनास्थळी जमला जमावपोलीस अधिकारी दाखलपरिसर केला सीलश्वानपथक दाखल

विनायक वाडेकरमुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील कुर्‍हा येथील रहिवासी तसेच पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ. पाटील यांची मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तीने गळा चिरून तसेच मानेवर वार करून हत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. कुऱ्हा येथील गोसावी पेट्रोलपंपाच्या परिसरामध्ये ही हत्या झाली. रात्री ही घटना किती वाजेची आहे यासंदर्भात कोणाला काहीही माहिती नाही. तसेच ते घरून रात्री बाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. तसेच त्यांच्यासोबत दोघे जण झोपलेले असल्याची चर्चादेखील ऐकायला मिळत आहे. सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सदर घटना उघडकीस आल्यानंतर जवळपास दोन ते तीन हजार नागरिकांचा जमाव या परिसरात जमला.घटनास्थळाला पोलिसांनी सील केले असून, आत कुणालाही प्रवेश दिला जात नाही.डी.ओ. पाटील हे अतिशय मनमिळावू राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व होते.ते मुक्ताईनगर पंचायत समितीला माजी सभापती म्हणून कार्यरत होते व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घटनास्थळावर पोलिसांचे हॅप्पी नामक श्वानपथक दाखल झाले.शान पथकाने पेट्रोल पंपासमोर असलेल्या नाल्यापर्यंत माग दाखवला असून पथक थांबून गेले आहे.डी .ओ. पाटील हे शेतीच्या कामानिमित्त ात्री-अपरात्री डिझेल भरण्यासाठी जात असत. बर्‍याचदा याचा पेट्रोल पंपावर ते रात्री झोपूनही जात असत. मारेकऱ्यांना याची माहिती असावी व त्यातूनच हा खून नियोजनबद्ध रित्या केला असावा, अशी माहिती मिळत आहे. मयत पाटील यांच्यासोबत ट्रॅक्टरचालक व एक व्यक्ती सोबत असल्याचीदेखील माहिती मिळत आहे.जळगाव येथून मोठ्या संख्येने पोलीस कुमकदेखील घटनास्थळी हजर झालेली आहे.दरम्यान, सकाळी सहा वाजल्यापासून मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक कैलास भारसके तसेच पोलीस उपनिरीक्षक नीलेश साळुंखे हे घटनास्थळावर हजर झाले. ते परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. आतापर्यंतची परिस्थिती नियंत्रणात आहे. अद्यापपावेतो कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनMuktainagarमुक्ताईनगर