शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

आषाढी पर्वावर ‘मुक्ताबाईने’ केली नगरपरिक्रमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST

राजेंद्र भारंबे लोकमत न्यूज नेटवर्क पंढरपूर : करिती क्षेत्र प्रदक्षिणा। त्याच्या पार नाही पुण्या ।। मुक्ताईनगर येथून निघालेला मानाचा ...

राजेंद्र भारंबे

लोकमत न्यूज नेटवर्क

पंढरपूर :

करिती क्षेत्र प्रदक्षिणा। त्याच्या पार नाही पुण्या ।।

मुक्ताईनगर येथून निघालेला मानाचा संत मुक्ताबाई पालखी सोहळा वाखरी येथील सकळ संतांच्या भेटीनंतर २० तास प्रवास करीत सोमवारी रात्री १ वाजता मठात दाखल झाला. आषाढी एकादशीनिमित्त नगर परिक्रमा करण्यात आली.

संत मुक्ताबाई समाधिस्थळ कोथळी - मुक्ताईनगर येथून निघालेली मुक्ताई पालखी वाखरी तळावर आपल्या भावंडांचे सकळ संतांचा भेट सोहळा झाला. वाखरीतून फक्त दोन भाविकांना पायी चालण्यास दिलेली परवानगी दहाही दिंडीचालकांना मान्य नव्हती. यावर प्रशासनाशी चर्चा करण्यात बराच वेळ गेला. अखेर ३० वारकरी ईसवाबी............पासून पायी चालण्यास परवानगी मिळाली. पंढरपुरात मुक्ताबाई मठात पोहोचण्यास रात्रीचा एक वाजला होता.

पाच दिवस मुक्काम मठातच राहील. येथेच दैनंदिन कीर्तन, प्रवचन, भजन आदी नित्योपचार पार पडत आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त नगर परिक्रमा करण्यात आली. सकाळी ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे व दुपारी ह.भ.प. संदीप महाराज खामणीकर यांचे कीर्तन पार पडले. एकादशीपासून पांडुरंगास नैवेद्यासाठी परवानगी असून फराळाचा पहिला नैवैद्य सम्राट पाटील व श्रध्दा पाटील यांनी दिला.

एकादशीस चंद्रभागा स्नानापासून भाविक वंचित

आषाढी एकादशी दिवशी चंद्रभागेच्या स्नानास अनन्यसाधारण महत्त्व वारकऱ्यांत आहे, परंतु प्रशासनाने ऐनवेळी चंद्रभागा स्नान नाकारल्याने नगरपरिक्रमेवरच समाधान मानावे लागले. बुधवारी पादुका स्नानास परवानगी मिळाली आहे.