शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग चौपदरीकरणास लोकसभेनंतरच मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 11:35 IST

निविदेत पुन्हा बदल

ठळक मुद्दे ७० कोटीचा खर्च ६२ कोटींवर

जळगाव : शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्र.६ (नवीन क्रमांक ५३) च्या समांतर रस्ते व चौपदरीकरण कामाच्या पहिल्या टप्प्यात चौपदरीकरणाच्या काढलेल्या निविदेत पुन्हा बदल झाला असून पथदिव्यांचे काम वगळण्यात आले आहे. त्यामुळे निविदेची किंमत ७० कोटींवरून ६२ कोटी झाली आहे. या बदलामुळे निविदा दाखल करण्यास आणखी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पर्यायाने हे काम लोकसभा निवडणुकीनंतरच प्रारंभ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आचारसंहितेपूर्वीच काम सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे ‘नही’च्या अधिकाºयांनी ‘लोकमत’ला सांगितले.या पहिल्या टप्प्यात खोटेनगर ते कालिंकामाता मंदिरापर्यंत सुमारे ८ किमी अंतराच्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. हा रस्ता डांबरीच केला जाणार आहे. तसेच प्रभात चौफुली, गुजराल पेट्रोलपंप व खोटेनगर येथे वाहनांसाठी भुयारी मार्ग तर खोटेनगर येथेच केवळ पादचाºयांसाठी भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. तर अजिंठा चौफुली, आकाशवाणी व ईच्छादेवी चौफुली या ठिकाणी चौक विस्तार करून मध्ये सर्कल करून रोटरी पद्धतीने वाहतूक वळविली जाणार आहे. महामार्गाच्या मध्यभागी एलईडी लाईट तर प्रत्येक चौकात हायमास्ट लॅम्प बसविण्यात येणार आहेत. मात्र ‘नही’ने निविदा प्रसिद्धीनंतर पथदिव्यांचे काम वगळण्याची सूचना केली आहे.१५ फेब्रुवारीनंतरच उघडणार निविदाशहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.५३ (जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६)च्या ८ किमी लांबीचे चौपदरीकरण करणे व ३ चौकांमध्ये व्हेईकल अंडरपास (वाहनांसाठी भुयारी मार्ग) व १ पादचाºयांसाठी भुयारी मार्ग या कामासाठी ६९ कोटी २६ लाखांची अंदाजित खर्चाच्या कामासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या आहेत. हे काम मक्तेदाराला दीड वर्षात पूर्ण करावे लागणार आहे. तर १० वर्ष देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही घ्यावी लागणार आहे. २० डिसेंबरपासून ई-निविदा मागविण्यात आल्या असून अंतीम मुदत ३१ जानेवारी २०१९ होती. त्यामुळे या ई-निविदा १ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी १२ वाजता उघडण्यात येणार होत्या. मात्र आता १५ दिवस मुदतवाढ दिल्याने १५ फेब्रुवारीनंतरच या निविदा उघडण्यात येतील.काम सुरू होणार कधी?... निविदेत बदल केल्याने निविदा दाखल करण्याची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. एकीकडे शासन आचारसंहितेच्या धाकाने विविध विकास कामांचे शॉर्ट टेंडर काढण्याची परवानगी देत असताना महामार्गाच्या निविदेची मुदत मात्र १५ दिवसांनी वाढविली आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीनंतर निविदा अंतीम करण्याची व कार्यादेश देण्याची कार्यवाही होण्यास किमान १५-२० दिवसांचा कालावधी लागेल. तोपर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागून जाईल. त्यामुळे हे काम थेट लोकसभा निवडणुकीनंतरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आचारसंहिता लागण्यापूर्वीच काम सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती ‘नही’च्या सूत्रांनी दिली.च्राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्यांच्या कामासाठी करण्यात आलेल्या डीपीआरला स्थानिक प्राधिकरणांशी चर्चा करून वीज पोल, अतिक्रमण, गटारी स्थलांतराबाबत ना-हरकत घेऊन व कार्यवाही करण्याची अट घालण्यात आलेली असली तरीही समांतर रस्त्यांचे काम हे दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात केवळ शहरातून जाणाºया महामार्गाचे चौपदरीकरण व चौकांमध्ये भुयारी मार्गांचेच काम केले जाणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्याची सुमारे ७० कोटीच्या कामाची निविदा २० डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाली.