शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुबीना, जुबीना और मैं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 15:58 IST

‘‘जुबीना तो उम्रभर किसी की माँ नही बन सकती, पर मेरी समझमें नहीं आता, कि बिवी क्यो नही बन सकती? मैने फैसला कर लिया है, कि उसे बिवी बना के रहूंगा.’’

कुंदन पाटील/आॅनलाईन लोकमत

जळगाव, दि.९ - ‘सरगम’ म्हणजे संगीत... कुठला सूर कुठल्या सुरात मिसळेल आणि नवीच लय तयार होईल, हे बरेचदा नियतीच्या हाती असतं. ‘सरगम’चं कथानकही असंच होतंङ्घ डफलीवाला नायक ‘ती’च्यासाठी दिल्या वचनानुसार वरसंशोधन करीत असतो आणि ‘तिने’ डफलीवाल्यालाच वरलेलं असतंङ्घ तिला ‘जुबान’ नसतेङ्घ काश्मिरातील पहलगामच्या ‘जुबीना’ची कथा जरा वेगळी. काश्मिरातील चारचौघींसारखाच जुबीनाचा चेहराही सफरचंदी लालभडक गालङ्घ अन् त्यावर झुलणारे काळेभोर केस... काश्मिरातल्या देदिप्यमान निसर्गाशी जणू तिच्या निरागस सौंदयार्ची स्पर्धा. अवघी तेरा वर्षांची होती, जेव्हा तिला इथंल्या निसगार्ची दृष्ट लागली. वर्ष २००३ आक्रोड पाडण्याचा हंगाम म्हणजे पहलगाम परिसरातली एक आगळीच धूम. जुबीना झाडाच्या शेंड्याला पोहोचलेली होती. जुबीनाला फांदी-फांदीचा सराव होता, अगदी खारुताई जशी, पण तो दिवस तिच्या या कौशल्याचा नव्हताच. अचानक आभाळ फाटलं. वाराही सैराट सुटला नेमकी तिच्या पायाखालची फांदी तुटली. पडताना गर्भाशयात शिरली.आक्रोडाचे भरघोस पीक दिलेल्या जमिनीवर जुबीना पडलेली होती. कधीही न उजवणारी कुस घेऊन. डॉक्टरांच्या एका डोळ्यात आसू तर दुसºया डोळ्यात हसू होतं...ङ्घ ‘अल्लाह का शुक्र हैं. बच्ची बच गयी, पर मुआफ करना बच्ची की बच्चेदानी को हम नहीं बचा सके. अब वो कभी माँ नहीं बन सकती.’ तिथं मुलगी तेरा-चौदा वर्षांची झाली, की पैगाम यायला (स्थळं यायला) सुरवात होतेच. ‘जुबां-दर-जुबां’ जुबीनाची गोष्ट पहलगामभर पसरली. कसले येणार मग पैगामङ्घ बालसखी आणि चुलतबहीणही (काकांची लेक) असलेली मुबीना जुबीनाच्या दु:खात बुडालेली. मुबीनाची ‘मुहब्बत’ हाच जुबीनाच्या जगण्यातला आनंद होताङ्घ पुढे मुबीनाला ‘पैगाम’ आला. तिचा निकाह झाला. वर्ष २००९. फयाद अहमद हे तिचे ‘शरिक-ए-हयात’ झाले. ‘शरिक-ए-हयात’ म्हणजे आयुष्याचे जोडीदारङ्घनिकाहनाम्यावर दस्तखत झाले. या दस्तखतने फयाद नखशिखांत मुबीनाचा झालेला होता. नियती मात्र पुढे फयादच्या दोन ‘किश्त’ करणार आहे. अगदी बालपणातल्या त्या संत्र्याच्या गोळीसारख्या, हे मुबीनाच्या गावीही नव्हतंङ्घ फयाद अहमद टॅक्सी चालवतो...मी सहकुटुंब काश्मिरला गेलो आणि फयादची भेट झाली. फयादची उर्दू सफाईदार. बोलण्या-वागण्यात कमालीची अदब. फयाद म्हणजे जणू ‘बज्म-ए-उर्दू-अदब’ फयादचे अब्बू पर्यटन खात्यात नोकरीला होते. काश्मिरचा जर्राजर्रा म्हणूनच फयादला तोंडपाठङ्घकाश्मिरच्या इतिहासाचाही गाढा अभ्यासङ्घकुराणातल्या बºयाच आयती फयादला मुखोद्गत, पण तो गीताही जाणतो. कुठल्या अध्यायात काय आहे आणि तेच कुराणातही कसे आलेले आहे, हे छान आणि खुलासेवार सांगतो. करप्शन त्याला अजिबात आवडत नाही. तिथले पोलिसही म्हणूनच की काय त्याच्यापासून दोन हात लांबच राहतात. मुबीनाचा आणि त्याचा संसार छान चाललेला होता. सुमैया आणि सुहेब ही फुलंही या संसारवेलीवर उमललेली. थोडक्यात फयादचे घर म्हणजे ‘जश्न-ए-बहार’च होते. फयादची एकच खंत होती, ती म्हणजे ‘जुबीना’. मुबीनाच्या घरी हिचं येणं-जाणं होतंच. जुबीनाचे हात पिवळे व्हावेत, असं जसं मुबीनाला वाटत होतं, तसंच फयादलाही वाटत होतं. जुबीनासाठी पैगाम येत तर नव्हतेच, पण तिच्या वतीने फयादनं नेलेल्या पैगामांनाही शून्य प्रतिसाद. फयादने कितीतरी उंबरे झिजवले, पण न उजवणारी कुस कुणालाही नको होती.ङ्घ जुबीना आणि फयादमधला संवाद वाढीला लागलेला होता. मुबीनाला आता हे सगळे खटकायला लागलेले होते. पण, जुबीनाचे दु:खही झेलवत नव्हतं. जुबीनासाठी फयादने नेलेला असाच एक आणखी पैगाम ठोकरला गेला. फयाद घरी परतला. मुबीना दारावरच होती. फयादही थबकला. दोघांच्या मध्ये काही काळ स्थिरावली एक निशब्द छटा. फयादनेच मग ही कोंडी फोडली. फयादच्या जडावलेल्या जिभेतून तो निर्णायक फैसला फुटला. फयाद म्हणाला, ‘‘जुबीना तो उम्रभर किसी की माँ नही बन सकती, पर मेरी समझमें नहीं आता, कि बिवी क्यो नही बन सकती? मैने फैसला कर लिया है, कि उसे बिवी बना के रहूंगा.’’ मुबीना भेदरली. गोंधळली. क्षणभर आक्रोडाच्या ‘त्या’ फांदीसारखी मुबीनाची गत झाली. पण पुढे तीच जुबीनाला सावरणारी जमीन बनलीङ्घ जुबीनाचा पायही आता फयाद नावाच्या फांदीवर होता. वर्ष २०१२. फयाद आता सारखाच ‘शरिक’ होता मुबीना व जुबीनच्या ‘हयाती’तङ्घ वर्ष २०१८ङ्घसुहेब मुबीनाच्या कडेवर आणि सुमैया जुबीनाच्या कडेवरङ्घ आमच्या सोबत फयाद. सुहेब, सुमैया दोघांना उद्देशून आपल्या खास उर्दू अदबमध्ये म्हणतो, ‘बच्चो चाचा को खुदा हाफिज बोलो, बोलो फिर आना धरती की इस जन्नतमें’. आणि या अदबमध्ये जणू विरून गेलेला असतोङ्घ विघटनवाद म्हणूनच मुबीना आणि जुबीनासोबत फयाजचा संसार पहेलगामच्या सौंदर्याएवढाच तोलाचा आणि मोलाचा ठरलाय....!!!