शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण कंपनी विरोधात तीव्र आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या थकित वीज बिलापैकी ५० टक्के मुद्दलमध्ये माफ करून ५० टक्के आत जी वसुली होईल, त्यापैकी ३५ ...

राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या थकित वीज बिलापैकी ५० टक्के मुद्दलमध्ये माफ करून ५० टक्के आत जी वसुली होईल, त्यापैकी ३५ टक्के ग्रामपंचायत ३५ टक्के वीज वितरण कंपनी आणि उर्वरित ३० टक्के रक्कम जिल्ह्यासाठी निधी म्हणून वापरला जावा, असा अत्यंत चांगला निर्णय घेतला असून ही वसुली २०२२पर्यंत करावी, असेदेखील निर्देश दिले असून या निर्णयाला शेतकऱ्यांचादेखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

एप्रिलपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी थकबाकी भरलेली असली तरी आता ऐन मे महिन्यात मशागतीचे आणि लागवडीचे दिवस असताना विजेची कुठलीही समस्या निर्माण झाल्यास, ट्रान्सफार्मर- केबल जळाल्यास महावितरण कंपनी सक्तीने शेतकऱ्याकडून वसुली करीत आहे. कोरोना काळात शेतकरी हवालदिल झालेला असताना अशाप्रकारची वसुली करणे योग्य नसून आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा भडगाव महावितरण कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना अंदाजे बिल न देता शेतात मीटर आहे किंवा नाही, बागायत क्षेत्र किती, विहिरीला पाणी आहे किंवा नाही, किती प्रमाणात वीज पुरवठा त्या ठिकाणी करण्यात आला, याची माहिती घेण्यात येऊनच शेतकऱ्यांना ठरावीक मुदतीत बिल भरण्याची सूचना दिली जावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

एकाच ट्रान्सफार्मरवर असलेल्या सर्व शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करणेदेखील योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. थकित वीज बिल वसुलीसाठी २०२२पर्यंत मुदत असतानादेखील सक्तीने वीजबिल वसुली का केली जात आहे, असा सवाल देखील त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे. यावेळी प्रवीण ब्राह्मणे, स्वीय सहाय्यक राजू पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.